दिनांक –०१/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- धारावीतल्या अपात्र झोपडीधारकांसाठी परवडणारी भाडेतत्त्वावरील घरे योजना राबवण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. धारावी पुनर्विकास प्रकल्पाने या संदर्भात झोपडपट्टीचा सर्व्हे तातडीने पूर्ण करून पात्र आणि अपात्र झोपडपट्टी धारकांची संख्या निश्चित करावयाची आहे. त्याप्रमाणे त्यांच्यासाठी किती जमीन लागेल, तेही निश्चित करायचे आहे. क्रेडीट लींक सबसिडी अंतर्गत राज्याशासनावर कोणतेही आर्थिक दायित्व येणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. या दायित्वाची जबाबदारी विशेष हेतू कंपनीची राहील. हे धोरण अन्य कोणत्याही प्रकल्पास लागू होणार नाही.
Author: Team GarjaMaharashtra
दिनांक –०१/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- मीरा-भाईंदर महानगरपालिकेतर्फे विविध विकासकामांचे उद्घाटन होत आहे, याचा मला आनंद होत आहे. मीरा-भाईंदर शहर स्वच्छ व सुंदर व्हावे, यासाठी शासन विविध विकास प्रकल्प प्रकल्प राबवित आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते घोडबंदर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण, भाईंदर पूर्व येथील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालनाचे लोकार्पण, घोडबंदर किल्ला जतन व संवर्धन, निरूपणकार डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी सभागृह इमारत लोकार्पण, भाईंदर नवघर येथील तलावातील म्युझिकल फाउंटनचे लोकार्पण, काशी गाव जरीमरी तलावातील म्युझिकल फाउंटनचे लोकार्पण, शासन निधीतून मंजूर झालेल्या विविध कामांचे ऑनलाईन पद्धतीने भूमीपूजन आणि लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते…
दिनांक –३०/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेना भोर, वेल्हा (राजगड),मुळशी विधानसभेचा विजय संकल्प मेळावा संपन्न झाला. शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख व मुळशी पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब चांदेरे यांनी धांगवडी येथे आयोजित केलेल्या या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी,शिवसैनिक व परिसरातील नागरिक उपस्थित होते. भोर राजगड मुळशी हा विधानसभा मतदारसंघ स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय आनंद दिघे साहेब यांच्या विचारांना मानणारा आहे. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी राज्यात सुरू केलेल्या कल्याणकारी योजनांवर व महायुती सरकारवर विश्वास ठेवणारा मतदार संघ आहे. शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी व…
दिनांक –३०/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- भगवान महावीर यांच्या २५५० व्या निर्वाण महोत्सवानिमित्त मुंबईतील सर्व जैन संघांनी आयोजित केलेल्या महारथ यात्रेला महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी रविवारी (दि. २९) वाळकेश्वर मुंबई येथील श्रीपाल नगर जैन मंदिर येथून झेंडा दाखवून रवाना केले. यावेळी राज्यपालांनी जैन मुनींचे दर्शन घेतले आणि उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले. यावेळी कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा, विश्वस्त रमण शहा, हिऱ्यांचे व्यापारी भरत शहा, हितेंद्र मोटा आदी उपस्थित होते.
दिनांक –३०/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील कर्दे गावाला कृषी पर्यटन श्रेणीत सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार २०२४ प्रदान करण्यात आला आहे. भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने जागतिक पर्यटन दिनानिमित्त या प्रतिष्ठित पुरस्काराची घोषणा केली होती. पर्यटन संचालनालयाचे सह संचालक स्वप्निल कापडणीस,सरपंच सचिन तोडणकर, उपसरपंच दत्ताराम भुवड, कृषी अधिकारी सुनील खरात यांनी हा पुरस्कार दिल्ली येथे स्वीकारला. या स्पर्धेत यश मिळवल्याबद्दल पर्यटन मंत्री गिरीश महाजन, पर्यटन सचिव जयश्री भोज, पर्यटन संचालक डॉ.बी. एन. पाटील यांनी अभिनंदन केले आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या ३० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील ९९१ गावांपैकी आठ वेगवेगळ्या श्रेणींमध्ये ३६ गावांची विजेते म्हणून निवड करण्यात आली…
दिनांक –३०/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- दुर्गा देवी हे शक्तीचे प्रतीक असून, वाईट प्रवृत्तींचा नाश करते. त्याचप्रमाणे समाजातील नराधमांना धडा शिकवणारी दुर्गा प्रत्येक घरात असावी या उद्देशाने ‘हर घर दुर्गा’ अभियान सुरू करत असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते 30 सप्टेंबर रोजी या अभियानाची सुरुवात करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम कुर्ला येथील शासकीय औद्योगिक संस्थेमध्ये आयोजित करण्यात येणार असून या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विशेष उपस्थिती असणार आहे. त्याचबरोबर केरळा स्टोरीज चित्रपटातील अभिनेत्री अदा शर्मा यावेळी उपस्थित राहणार आहे. या अभियानामार्फत राज्यातील…
दिनांक –३०/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- नाशिक शहरात गोदावरी नदीच्या काठावर साडेसात एकर जागेत साकारण्यात आलेले उद्यान जागतिक दर्जाचे व तेवढेच दर्जेदार आहे. या उद्यानामुळे नागरिकांना विरंगुळ्यासाठी हक्काचे ठिकाण मिळाले आहे. या उद्यानात बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आधारित कार्यक्रमासाठी दहा कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे सांगितले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे, आमदार संजय शिरसाट, महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, माजी उपमहापौर अजय बोरस्ते यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, या उद्यानात सर्व तरुण…
दिनांक –३०/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- नाशिक येथे छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) च्या 156 कोटींच्या विभागीय कार्यालयासह विविध इमारती बांधण्यात येणार आहेत. या विभागीय कार्यालयासह अभ्यासिका, 500 मुलांची व 500 मुलींची वसतिगृह इमारत तसेच 43 कोटी रूपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या धनगर समाजातील 100 विद्यार्थी व 100 विद्यार्थीनींसाठीचे वसतिगृह व कार्यालय इमारत आणि 25 कोटी रूपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या वनभवन इमारतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते कोनशिला अनावरण करून भूमिपूजन झाले. भूमिपूजन समारंभ कार्यक्रमास आमदार प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे,…
दिनांक –३०/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- महात्मा जोतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सामाजिक समतेचे प्रतिक आहेत. त्यांनी शेतकरी, कामगार, महिला आणि कष्टकऱ्यांसाठी आपले सर्वस्व अर्पण केले. त्यांचे कार्य महाराष्ट्राबरोबरच जगासाठी वंदनीय आहे. महापुरुषांची स्मारके प्रेरणादायी, ऊर्जा देणारी आणि दिशादर्शक असतात, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मंत्री श्री. भुजबळ यांच्या संकल्पनेतून नाशिक महानगरपालिकेतर्फे मुंबई नाका येथे साकारण्यात आलेल्या क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचा लोकार्पण सोहळा आज दुपारी संपन्न झाला. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री दादाजी भुसे, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन…
दिनांक –३०/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:-आपली वडीलधारी मंडळी ही आपली संपत्ती असून त्यांचे अनुभव, ज्ञान ही आपल्यासाठी मोठी शिदोरी आहे. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात आनंद, समाधानाचे क्षण आणण्याच्या भावनेतून राज्यातील सर्व धर्मींयातील साठ वर्षे व त्यावरील ज्येष्ठांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मुख्यमंत्री तीर्थ योजना सुरु केली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे त्यांच्या हस्ते मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ संपन्न झाला. यावेळी कोल्हापूर येथे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रेल्वेच्या प्रवासाला सुरूवात झाली. खासदार धैर्यशील माने यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. ‘जय श्रीराम जय…