दिनांक –०७/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (आरसीएफ) थळ तर्फे रायगड जिल्ह्यातील डायलेसिस रुग्णांना औषधोपचार उपलब्ध व्हावा यासाठी रु.20 लाख रुपयांचे अर्थसहाय्य निगमित सामाजिक दायित्व (सीएसआर) च्या माध्यमातून देण्यात आले आहे. आरसीएफचे प्रभारी कार्यकारी संचालक नितीन हिरडे यांनी आज जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या उपस्थितीत जिल्हा शल्य चिकित्मक डॉ.अंबादास देवमाने यांना सदर रकमेचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी आरसीएफचे प्रभारी कार्यकारी संचालक (थळ) नितीन हिरडे यांसह संजीव हरळीकर, महाव्यवस्थापक (मासं व प्र, ईटीपी), महेश पाटील प्रभारी मुख्य व्यवस्थापक (प्रशासन) व संतोष वझे (जनसंपर्क अधिकारी) उपस्थित होते. रायगड जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रतिमाह सुमारे 600 डायलेसिस सेशन्स होत असतात…
Author: Team GarjaMaharashtra
दिनांक –०७/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या वाशिम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील तिर्थक्षेत्र पोहरादेवी येथील बंजारा विरासत संग्रहालयाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी, प्रधानमंत्री मोदी यांनी नंगारा भवन परिसरातील बंजारा विरासत संग्रहालयाची पाहणी करुन बंजारा समाजाच्या संस्कृती व इतिहास यासंदर्भात माहिती जाणून घेतली. तसेच नगारा वाद्याचे वादनही त्यांनी केले. यावेळी बंजारा समाजातील परंपरागत नृत्य प्रधानमंत्र्यांसमोर सादर करण्यात आले. श्री. संत सेवालाल महाराज, पोहरादेवी तीर्थश्रेत्र विकास आराखड्यांतर्गत 723 कोटी रुपये खर्चून या तीर्थश्रेत्राचा सर्वांगीण विकास करण्यात येणार आहे. या संग्रहालयात बंजारा समाजातील रुढी-परंपरा, पारंपारिक वेशभूषा, सांस्कृतिक इतिहास आदीबाबत विविध कलाकृतींच्या माध्यमातून माहिती प्रतिबिंबीत केली…
दिनांक –०७/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्या एसयूव्ही उत्पादक कंपनीने आज भारतातील पहिल्या क्रमांकाची सर्वाधिक विक्री होणारी कार टाटा पंचची स्पेशल, लिमिटेड पीरियड कॅमो (CAMO) एडिशन लाँच केली. आता ही एडिशन आकर्षक नवीन सीवीड ग्रीन रंगासह पूरक सफेद रंगाचे रूफ, आर१६ चारकोल ग्रे अलॉई व्हील्स आणि अद्वितीय सीएएमओ थीम पॅटर्न असलेले प्रीमियम अपहोल्स्टरीसह उपलब्ध आहे. या एडिशनमध्ये फर्स्ट-इन-सेगमेंट वैशिष्ट्ये देखील आहेत, जसे १०.२५-इंच इन्फोटेन्मेंट सिस्टमसह वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅप्पल कारप्ले. या एडिशनमध्ये कम्फर्ट-टेक वैशिष्ट्ये देखील आहेत, जसे वायरलेस चार्जर, रिअर एसी वेंट्स व फास्ट सी-टाइप यूएसबी चार्जर आणि ग्रॅण्ड कन्सोलसह आर्मरेस्ट, जे टाटा पंचची…
दिनांक –०७/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- किया या आघाडीच्या प्रीमियम कारमेकरने पुन्हा एकदा भावी दृष्टिकोन अवलंबवत आपल्या २.० परिवर्तन धोरणासह भारतीय ऑटोमोबाइल इकोसिस्टमला नव्या उंचीवर नेले आहे. किया २.० हा वेईकलमधील डिझाइन व तंत्रज्ञान सुधारण्याप्रती केंद्रित दृष्टिकोन आहे, जो भारतीय ऑटोमोबाइल उद्योगामधील परिवर्तनामध्ये अग्रस्थानी आहे. कंपनीने अभूतपूर्व तंत्रज्ञानांसह या परिवर्तनाला सुरूवात करण्यासाठी ईव्ही९ आणि कार्निवल लिमोझिन लाँच केली, ज्यामधून उद्योग अग्रणी म्हणून कंपनीची क्षमता दिसून येते. कियाने ईव्ही९ आणि कार्निवल लिमोझिनमधील २० प्रबळ सुरक्षितता वैशिष्ट्यांसह सक्रिय व निष्क्रिय सुरक्षिततेमध्ये वाढ केली आहे. कंपनीकडून ईव्ही९ व कार्निवल लिमोझिन लाँच, ज्यांची सुरूवातीची किंमत अनुक्रमे १,२९,९०,००० रूपये आणि ६३,९०,००० रूपये आहे. किया…
दिनांक –०७/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही नेहमी सुरु रहावी यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद करण्यात आली असून ही योजना बंद तर पडणार नाहीच उलट लाभाची रक्कम ही टप्प्या टप्प्याने वाढविण्यात येईल,असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे आपल्या लाडक्या बहिणींना दिला. छत्रपती संभाजीनगर येथे खडकेश्वर परिसरात मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदान येथे ‘मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान’ अंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान’ आणि ‘राज्यस्तरीय विविध योजनांचा लोकार्पण सोहळा’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. पालकमंत्री अब्दुल सत्तार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, महिला व बालविकास मंत्री…
दिनांक –०७/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- पोलीस पाटील हा गाव पातळीवरील प्रशासनाचा एक महत्त्वाचा घटक असून शासनाचे नाक, कान आणि डोळे आहेत. गावातील सर्व घटकांमध्ये समन्वय राखण्याचे काम पोलीस पाटील करीत असतात. त्यांच्या सर्व मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून संवेदनशिलतेने निर्णय घेऊ,असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पोलीस पाटील संघटनेच्या मेळाव्यात दिले. महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशन संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय आभार मेळावा व सत्कार समारंभ समृद्धी लॉन्स, हर्सूल सावंगी रोड येथे आयोजित करण्यात आला होता. पोलीस पाटीलांचे मानधन शासनाने 15 हजार रुपये केले त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे आभार पोलीस पाटील संघटनेने व्यक्त केले. या मेळाव्यास जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार,शहर व औद्योगिक…
दिनांक –०७/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- भगवान गौतम बुद्धांच्या पाली भाषेला अभिजात दर्जा दिल्याबद्दल भिख्खू संघाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे आभार..! विश्वातील सर्वात पुरातन तसेच भगवान गौतम बुद्ध यांच्या काळापासून जगप्रसिद्ध असलेल्या पाली भाषेला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल मुंबईतील बीकेसी येथे ऑल इंडिया भिख्खू संघाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना पंचशीलाचा गमचा घालून व गौतम बुद्धांची प्रतिमा देऊन आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी भिख्खू संघासोबत त्यांनी बुद्ध वंदना कथन केली. भिख्खू संघाबरोबर संवाद साधताना मोदीजी म्हणाले की, पाली भाषेचा बुद्ध धर्मासोबत खूपच घट्ट नातं आहे. येत्या काळात अधिकाधिक तरूण पिढी पाली भाषेविषयी ज्ञान मिळवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी…
दिनांक –०७/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानच्या वतीने मुंबई आणि परिसरातील शहरांमधील सातारकरांचा भव्य दसरा मेळावा गुरुवार दिनांक १० ऑक्टोबर २०२४ या दिवशी सायंकाळी पाच वाजता दादर येथील शिवाजी मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी प्रमुख अतिथी महंत स. भ.मोहनबुवा रामदासी,विजयजी शिर्के , शिर्के ग्रुप,कायदेतज्ज्ञ ऍड.उदयजी वारुंजीकर,हास्यसम्राट भाऊ कदम तसेच अन्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांना सातारा रत्न आणि सातारा भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहेत. हे पुरस्कार जाहीर झालेले मान्यवर असे राजकीय रत्न – श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, कला रत्न – राहुल भंडारे, कामगार…
दिनांक –०७/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- जय महाराष्ट्र सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाचा धारावी येथील नवरात्रौत्सवातील यंदाचा बद्रीनाथ मंदिराचा देखावा भाविकांचे विशेष आकर्षण ठरला आहे. उत्तराखंड राज्यातील या मंदिराची प्रतिकृती हुबेहूब साकारली गेली आहे. त्यासाठी अनेक सूक्ष्म बाबींवर विशेष काम करण्यात आले आहे. या देखाव्यासाठी भाविकांची विशेष गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. बद्रीनाथ मंदिराची ही प्रतिकृती ३० फूट उंच आणि ७० फूट रुंद आहे. चार धाम पैकी हे एक मंदिर असल्यामुळे भाविकांची एकच गर्दी होत आहे. मंडळाचे अध्यक्ष सुरेश सावंत यांच्यासमवेत सचिव रामचंद्र महाडेश्वर, कार्याध्य़क्ष बबनराव घाग आदींनी यासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत. दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे देखावे सादर करण्याची मंडळाची…
दिनांक –०७/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- ५१ वी राज्यस्तरीय कॅडेट आणि ज्युनियर स्पर्धेच्या पहिल्या दिवशी कॅडेट गटाच्या सामन्यांमध्ये बहारदार खेळी करत क्रीडा प्रबोधिनीच्या स्वराज लाड, साक्षी कांबळे, ठाण्याच्या तेजस चव्हाण, संभाजीनगरच्या संस्कार मुसळे, कोल्हापूरच्या पृथ्वीराज चव्हाण आणि मुंबईच्या विहान कोटीयान यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यावर निर्विवाद वर्चस्व मिळवत सुवर्ण पदक पटकावले. मुलींच्या गटात यवतमाळची स्नेहल ढोरे आणि क्रीडा प्रबोधिनीच्या साक्षी कांबळे यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्याला हरवले. शिओ तोशी या डावाने पीजेएच्या वृंदा शेलार हिला यवतमाळची स्नेहल ढोरे हिने आस्मान दाखवले तर क्रीडा प्रबोधिनीच्या साक्षी कांबळे हिने योको गाके डावाचा योग्य वेळेत परिणामकारक वापर करून संभाजीनगरच्या श्रुतकिर्ती खलाटे हिला अंतिम चरणात हरवले. सातार्याच्या…
