दिनांक –०४/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- द बॉडी शॉप हा ब्रिटीश-निर्मित आंतरराष्ट्रीय एथिकल ब्युटी ब्रँड प्लास्टिक फॉर चेंज (पीएफसी) सोबतच्या प्रभावी सहयोगाच्या पाचव्या वर्षाला साजरे करत आहे. पीएफसी हा मुंबईमध्ये स्थित जगातील प्रमाणित रिसायकल केलेल्या प्लास्टिकचा सर्वात मोठा स्रोत आहे. या क्षणाला साजरे करण्यासाठी ब्रँडने पुरस्कार-प्राप्त स्पार्क ए चेंजचा भाग म्हणून नवीन डिजिटल जाहिरातीचे अनावरण केले, ज्यामध्ये भारतीय अभिनेत्री व मॉडेल डायना पेण्टी आहेत. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात दक्षिण आशियामधील द बॉडी शॉपच्या क्वेस्ट रिटेलचे चीफ ब्रँड ऑफिसर हरमीत सिंग, तसेच प्लास्टिक्स फॉर चेंजच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनिधी कश्यप आणि प्रोग्राम लाभार्थी दीपा एकत्र आले. त्यांनी या अर्थपूर्ण सहयोगाचा प्रवास…
Author: Team GarjaMaharashtra
दिनांक –०४/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- इंडिया एज्युकेशन फोरम आणि इंडिया एम्प्लॉयर फोरम यांच्याद्वारे सह-प्रस्तुत मेकिंग इंडिया एम्प्लॉयेबल कॉन्फरन्स अँड अवॉर्डस (एमआयईसीए) २०२४चे मुंबईत यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रायोजक टीमलीज एडटेकला भारतातील रोजगार अजेंडाबाबत चर्चेला चालना देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्याचा अभिमान वाटत आहे. या पुरस्कार सोहळ्याला शिक्षण, उद्योग व स्किलिंग क्षेत्रांमधील ८० हून अधिक प्रभावी प्रमुख व व्यावसायिकांसोबत दिग्गज जसे पद्मविभुषण डॉ. रघुनाथ अनंत माशेलकर, सिम्बायोसिसचे दूरदर्शी संस्थापक व अध्यक्ष पद्मभूषण डॉ. एस. बी. मुजुमदार, मेरिको लिमिटेड व काया लिमिटेडचे अध्यक्ष श्री. हर्ष मारीवाला, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयचे सचिव श्री. अतुल कुमार तिवारी उपस्थित होते. टीमलीज…
दिनांक –०४/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- महाराष्ट्र शासनाने युवकांच्या विकासासाठी कौशल्य विद्यापीठ स्थापन केले असून हे देशातील एकमेव कौशल्य विद्यापीठ आहे, ज्यामध्ये कौशल्ययुक्त शिक्षण देऊन प्रत्यक्ष रोजगार देण्यावर भर दिला जात आहे. ही अत्यंत अभिमानाची बाब असून राज्याच्या कौशल्य विकास विभागाने नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे देशात आपली वेगळी ओळख निर्माण केली असून हे कौतुकास्पद असल्याचे केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी सांगितले. एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय येथे आय. टी. आय मुंबईचे नामकरण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुंबई आणि संत गाडगेबाबा स्वच्छ भारत प्रबोधिनी गोरेगाव, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, अमरावती व नागपूर येथे शुभारंभ मान्यवरांच्या…
दिनांक –०४/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- थोर स्वातंत्र्यसेनानी व मराठवाडा मुक्ती संग्रामाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीनिमित्त आज विधानभवन परिसरातील त्यांच्या पुतळ्यास विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे, सचिव डॉ.विलास आठवले यांच्यासह विधानमंडळातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
दिनांक –०४/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेतील प्राथमिक फेरीसाठी वाढीव पाच केंद्रांना मान्यता देण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे. महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेतील प्राथमिक फेरीतील अस्तित्वातील १९ केंद्रांव्यक्तीरिक्त पाच केंद्रांची संख्या वाढवून एकूण २४ केंद्रे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात हौशी कलावंत संघटनेतर्फे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आहे. दिनांक १० जुलै २०२३ रोजी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह हौशी कलावंत संघटनेच्या पदाधिका-यांच्या झालेल्या बैठकीत वाढीव केंद्रांना मान्यता देण्याचे आश्वासन मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिले होते. या आश्वासनाची पूर्तता झालेली असून पाच वाढीव केंद्रांना मान्यता देण्यात आलेली आहे.
दिनांक –०४/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- खामगांव येथील श्री महर्षी वेद व्यास प्रतिष्ठान, आळंदीअंतर्गत जय जगदंबा वेद विद्यालयाच्या नवीन वास्तूचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. खामगांवमधील घाटपुरी येथील श्री.जय जगदंबा माता संस्थान येथे आयोजित या भूमिपूजन समारंभास केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण तथा आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आमदार आकाश फुंडकर, आमदार संजय गायकवाड, अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी तिर्थक्षेत्राचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज, संस्थानचे अध्यक्ष पंकज केला, उपाध्यक्ष कृष्णकुमार भट्टड, संस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रथम श्री जगदंबा मातेचे दर्शन घेवून पूजन केले. तसेच जय जगदंबा वेद विद्यालयाच्या नवीन वास्तूचे भूमिपूजन करुन कोनशिलेचे अनावरण…
दिनांक –०४/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. राज्यशासन जनतेच्या कल्याणासाठी वेळोवेळी धोरणात्मक निर्णय घेत आहे. हे निर्णय विविध योजना आणि उपक्रमांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम करत आहे. शिक्षण, आरोग्य, उद्योग, कृषी, आपत्ती व्यवस्थापन, तसेच महिला आणि युवकांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे तसेच ‘मुख्यमंत्री–माझी लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या योजनांचे नियोजन व अंमलबजावणी याबाबत मुख्य सचिव श्रीमती सौनिक यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमात माहिती दिली आहे. ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुख्य सचिव श्रीमती…
दिनांक –०४/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- सध्या विदर्भ दौऱ्यावर असलेले महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी मराठीसह पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचे आभार मानले आहेत. “समस्त महाराष्ट्राच्या आणि मराठी भाषेच्या इतिहासात आजचा हा दिवस सुवर्ण अक्षरांनी कोरला जाईल. संत ज्ञानेश्वर माऊली, संत चक्रधर स्वामी, जगद्गुरू संत तुकाराम यांसह महाराष्ट्रातील अनेक संतांची व समाजसुधारकांची भाषा असलेल्या मराठी भाषेचा अभिजात भाषा जाहीर झाल्यामुळे सन्मान झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, लोकमान्य टिळक, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांसह असंख्य स्वातंत्र्यसैनिक आणि क्रांतिकारक तसेच जनसामान्यांच्या लाडक्या मराठी भाषेचा सन्मान…
दिनांक –०3/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- जल जीवन मिशनची संपूर्ण राज्यात यशस्वी अंमलबजावणी होत असून यामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा मोठा सहभाग आहे. ‘हर घर जल’ योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत दररोज ५५ लिटर पिण्याचे पाणी देण्याचे उद्दिष्ट ठेवून मोठे काम होत आहे. कॉफी टेबल बुक च्या माध्यमातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची विकास कामे व वाटचालीची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केला आहे. कॉफी टेबल बुकचे प्रकाशन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज मंत्रालयात केले. यावेळी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रकाशन प्रसंगी आमदार दीपक चव्हाण, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन…
दिनांक –०3/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) द्वारा आयोजित महाराष्ट्रातील पहिला एमटीडीसी अॅक्वाफेस्ट २०२४ येत्या २ ते ४ ऑक्टोबर २०२४ दरम्यान मेहरूण तलाव, गणेश घाट, जळगाव येथे होणार आहे. या अनोखा महोत्सवाचे २ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १०:०० वाजता पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. एमटीडीसीद्वारे आयोजित हा जलक्रीडा महोत्सव जळगाव शहरातल्या नागरिकांना जल पर्यटनाचा थरारक आणि अनोखा अनुभव अगदी परवडणाऱ्या दरात देणार आहे. एमटीडीसी अॅक्वाफेस्ट २०२४ हा फक्त एक महोत्सव नसून तरुणांमध्ये साहसी क्रीडांविषयी आवड निर्माण करणे आणि जलसंपत्तीचे संवर्धन व जलसुरक्षेचे महत्व पटवून देणे हा आहे. पर्यटन सचिव जयश्री भोज…