Author: Team GarjaMaharashtra

दिनांक –१४/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- नवी मुंबईच्या विकासाला गती देणारे चांगले काम नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून होत असून 25 नागरी सुविधांचे व प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन होत आहे, याबद्दल समाधान व्यक्त करीत मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांनी ऑलिंपिक आकाराचा तरणतलाव, महिलांसाठी कॅन्सर तपासणी सुविधा, 10 बेडचा केमोथेरपी वॉर्ड, शाळा, मार्केट, आरोग्य केंद्र, जलकुंभ, ई-बसेस, ई-चार्जिंग अशा 410 कोटीहून अधिक रकमेच्या विविध प्रकारच्या सुविधांचा यामध्ये समावेश असल्याचे सांगितले. पाण्यावर पुनर्प्रक्रिया केली जाते, आता महानगरपालिका कापडावर पुनर्प्रक्रिया करणार आहे, अशा वेगळया प्रकारच्या आधुनिक प्रकल्पाचा लोकांना फायदा होईल, असेही ते म्हणाले. नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडको यांच्या वतीने वाशी येथील सिडको प्रदर्शनी…

Read More

दिनांक –१४/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामार्फत हायब्रिड ॲन्युटी मॉडेल (हॅम) टप्पा-२ या प्रकल्पांतर्गत राज्यात ३७ हजार कोटींच्या निधीतून ६ हजार कि.मी लांबीच्या रस्त्यांच्या प्रकल्पाचे भूमिपूजन समारंभ ऑनलाईन पध्दतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पार पडला. यावेळी विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा पाटणकर म्हैसकर, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दिक्षित, सचिव सदाशिव साळुंखे, सचिव संजय दशपुते, माजी आमदार प्रमोद जठार, मुख्य अभियंता हांडे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे व महामंडळाचे अधिकारी मंत्रालयातील ऑनलाईन समारंभस्थळी उपस्थित होते. हॅमच्या माध्यमातून राज्यातील विविध ठिकाणी येत्या अडीच वर्षांच्या काळात ६ हजार कि.मी लांबीचे…

Read More

दिनांक –१४/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीची आज यशस्वी चाचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली. वायुदलाचं C-295 या विमान धावपट्टीवर यशस्वीपणे उतरविण्यात आले. या विमानांना वॉटर कॅनानद्वारे अनोखी सलामी देण्यात आली. याबरोबरच लढाऊ सुखोई 30 (Sukhoi) विमानानेही यशस्वी टेक ऑफ केलं. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम आता जवळपास अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी विमानतळाच्या धावपट्टीची आज चाचणी करण्यात आली. या चाचणीनंतर सुखोई 30 या लढाऊ विमानानेही फ्लायपास केला. लँडींग करणाऱ्या सी 295 विमानाच्या वैमानिकाचा मुख्यमंत्री श्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी केंद्रिय नागरी उड्डाण…

Read More

दिनांक –११/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी विजयादशमीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. दसरा अथवा विजयादशमीचा सण अपप्रवृत्तींवर सतप्रवृत्तीच्या विजयाचे प्रतीक आहे. सत्याचा नेहमीच विजय होत असतो, असा विश्वास या सणाच्या माध्यमातून मिळतो. यंदाची विजयादशमी सर्वांच्या जीवनात आनंद, समाधान व संपन्नता घेऊन येवो या प्रार्थनेसह सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

Read More

दिनांक –११/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- नॉन क्रीमीलेअरची उत्पन्न मर्यादा वाढवण्याची विनंती केंद्र शासनाला करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्यासंदर्भात ( नॉन-क्रीमीलेअर) उत्पन्नाची मर्यादा आठ लाखांवरून पंधरा लाख रुपये इतकी करण्याची शिफारस केंद्र शासनास करण्यात येईल.

Read More

दिनांक –११/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- पालघर जिल्ह्यातील विविध गावांतील जागा एमआयडीसीला देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. मौजे दापचरी व मौजे वंकास (ता.डहाणू) येथील कृषी व पदुम विभागाच्या 460.00.0 हे. आर जमिनीपैकी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने निश्चित केलेली 377.26.19 हे. आर शासकीय जमीन तसेच मौजे टोकराळे येथील 125.55.2 हे.आर ही शासकीय जमीन प्रचलित वार्षिक बाजारमुल्य दर तक्त्यानुसार शेती दराने येणारी कब्जेहक्काची रक्कम आकारून भोगवटादार वर्ग-2 म्हणून एमआयडीसीला देण्यात येईल.

Read More

दिनांक –११/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाची पुनर्रचना करून या विभागाचे नामकरण पशूसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मस्त्यव्यवसाय विभाग असे करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. पुनर्रचनेनंतर पशूसंवर्धन आयुक्तालय व दुग्धव्यवसाय आयुक्तालयाचे एकत्रीकरण करून पुनर्रचनेनंतर आयुक्त पशूसंवर्धन व दुग्धव्यवसाय असे या पदाचे नाव राहील. राज्यातील 351 तालुक्यांत तालुका पशूसंवर्धन व दुग्धव्यवसाय अधिकारी कार्यालय सुरु करण्यात येईल. त्याचप्रमाणे 169 तालुक्यात तालुका लघू पशूवैद्यकीय सर्वचिकित्सालय सुरु करण्यात येतील. राज्यातील 2 हजार 841 पशू वैद्यकीय श्रेणी दोन दवाखान्यांचे श्रेणी एक दवाखान्यात श्रेणीवाढ करण्यात येईल. त्याशिवाय 12 हजार 222 नियमित पदांना व कंत्राटी…

Read More

दिनांक –११/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. या वर्षीही सर्व शासकीय/ निमशासकीय कार्यालये, शासकीय संस्था/ मंडळे, सार्वजनिक उपक्रम इ. कार्यालयांनी विविध उपक्रमांचे आयोजन करण्याबाबत शासनाने निर्देश दिले आहेत. वाचन प्रेरणा दिनाच्या अनुषंगाने घेण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबत प्रसारमाध्यमांनी उचित दखल घेऊन त्यांना व्यापक प्रसिद्धी द्यावी. प्रसारमाध्यमांच्या कार्यालयात देखील वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात यावा, असे आवाहन मराठी भाषा विभागाचे सहसचिव डॉ. नामदेव भोसले यांनी केले आहे.

Read More

दिनांक –११/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या ८.४३ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२४ अदत्त शिल्लक रकमेची परतफेड ११ नोव्हेंबर, २०२४ पर्यंत देय असलेल्या व्याजासह १२ नोव्हेंबर, २०२४ रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येईल, असे वित्त विभागाच्या (वित्तीय सुधारणा), सचिव श्रीमती शैला ए. यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळविले आहे. “परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१” अन्वये महाराष्ट्र शासनाने वरील दिनांकास सुटी जाहीर केल्यास, राज्यातील अधिदान कार्यालय, कर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी करेल. या कर्जावर दि. १२ नोव्हेंबर, २०२४ पासून व त्यानंतर कोणतेही व्याज अदा करण्यात येणार नाही. सरकारी प्रतिभूती विनियम, २००७ च्या उप-विनियम २४(२) व २४(३) अनुसार, दुय्यम सर्वसाधारण…

Read More

दिनांक –११/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- अनुसूचित जाती – जमातीच्या वर्गातील कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक तक्रारी जलदगतीने सोडविण्यासाठी आयोग कार्यरत आहे. सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने आयोग न्यायप्रक्रिया राबवित असल्याचे अनुसूचित जाती जमाती राज्य आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शन आणि सहकार्याने राज्य आयोग समानता आणि सामाजिक न्यायासाठी कार्यरत आहेत. अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या अनेक प्रश्नांना न्याय देण्याच्या आणि समाजाच्या उन्नतीच्या दृष्टीने अनेक योजना शासनाने अंमलात आणल्या आहेत. आयोगातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी प्रामाणिकपणे कार्यरत असून प्रलंबित प्रकरणाचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी त्यांचे सहकार्य महत्वाचे आल्याचेही त्यांनी सांगितले. उपाध्यक्ष मेश्राम…

Read More