Author: Team GarjaMaharashtra

दिनांक –१६/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:-सी एन जी पंपावर गॅस भरत असताना त्याच्या गॅसचे नोझल उडून ते कामगाराच्या डाव्या डोळ्यावर जोरात लागले. हा फटका इतका जबरदस्त होता की, त्यामुळे कामगाराला आपला डावा डोळा कायमचा गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत हर्षद गणेश गेहलोत (वय २३, रा. शंकर महाराज वसाहत, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी मालक व मॅनेजर धैर्यशील पानसरे व राहीत हरकुर्की यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार धनकवडीतील तीन हत्ती चौकातील एस स्क्वेअर सी एन जी पेट्रोल पंपावर रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनकवडीतील तीन हत्ती…

Read More

दिनांक –१६/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- मुंबई पोर्ट ट्रस्टने (बीपीटी) आपले दरवाजे सर्वसामान्यांसाठी खुले केले आहेत. 20 डिसेंबरपर्यंत, लोक बंदरात विनामूल्य फेरफटका मारू शकतात आणि त्याच्या 150 वर्षांच्या जुन्या इतिहासाबद्दल जाणून घेऊ शकतात. या दौऱ्यात बंदर अधिकारी बंदराचे कामकाज आणि जहाजांच्या दुरुस्तीच्या प्रक्रियेची माहिती देतात. देशातील सर्वात जुन्या बंदरांपैकी एक असलेल्या मुंबई पोर्ट ट्रस्टचे (बीपीटी) दरवाजे सर्वसामान्यांसाठी खुले झाले आहेत. दोन दिवसांत 1500 हून अधिक लोकांनी बंदर गाठले आणि 150 वर्षे जुन्या बंदराचे महत्त्व जाणून घेतले. दक्षिण मुंबईतील बीपीटीची स्थापना १८७३ मध्ये झाली. गेल्या अनेक दशकांपासून या बंदराचा वापर सागरी व्यापारासाठी होत आहे. सध्या या बंदराचा वापर केवळ व्यावसायिक…

Read More

दिनांक –१६/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- आम्ही मागील अडीच वर्षे टीम म्हणून काम केले आहे. आता आमची जबाबदारी वाढलेली आहे. जनतेच्या प्रति आम्ही उत्तरदायी आहोत. ‘मिशन समृद्ध महाराष्ट्र’ हे उद्दिष्ट ठेवून काम करणार आहोत. शेतकऱ्यांच्या, जनतेच्या हिताचे प्रकल्प सुरू करून त्यांना चालना दिली. एकीकडे विकास आणि दुसरीकडे लोककल्याणकारी योजना यांची सांगड घातली. लोकाभिमुख आणि गतिमान शासन आणून यापुढेही गतिमानतेने निर्णय घेऊ. या पुढील काळात सर्वसामान्य जनतेसाठी व राज्याच्या विकासासाठी काम करणार आहोत. देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर करण्यास महाराष्ट्र शासन हातभार लावणार आहे.

Read More

दिनांक –१६/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:-  राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला असून यामध्ये एकूण 39 मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे. महाराष्ट्रात आजपासून गतिशील कारभार सुरू झाला आहे. हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षाने विविध संसदीय आयुधांचा वापर करून उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांवर चर्चा करून राज्याच्या व जनतेच्या हितासाठी निर्णय घेण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. हिवाळी अधिवेशनात एकूण 20 विधेयके मांडण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रामगिरी या शासकीय निवासस्थानी आयोजित मंत्रिपरिषद बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आदी उपस्थित होते. हिवाळी अधिवेशन…

Read More

दिनांक –१६/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी 33 मंत्री व 6 राज्यमंत्र्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. ऐतिहासिक राजभवनाच्या हिरवळीवर शपथविधीचा सोहळा पार पडला. समारंभास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांची उपस्थिती होती. समारंभास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतलेल्यांमध्ये चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, गणेश नाईक, दादाजी भुसे, संजय राठोड, धनंजय मुंडे, मंगलप्रभात लोढा, उदय सामंत, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, अतुल सावे, अशोक ऊईके, शंभुराज देसाई, अँड.आशिष शेलार, दत्तात्रय भरणे, आदिती तटकरे, शिवेंद्रसिंह भोसले,…

Read More

दिनांक –१६/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्‍या ऑटोमोटिव्‍ह उत्‍पादक कंपनीने सीएनजी वेईकल श्रेणीमध्‍ये मोठे प्रयत्‍न करणे सुरू ठेवले आहे, जेथे मार्केट लीडर म्‍हणून स्‍वत:ला प्रस्‍थापित केले आहे. प्रबळ उत्‍पादन पोर्टफोलिओ आणि धोरणात्‍मक उपक्रमांसह कंपनीने आर्थिक वर्ष २०२४ च्‍या पहिल्‍या सहामाहीत एकूण सीएनजी श्रेणीमध्‍ये २१.१ टक्‍क्‍यांचा प्रभावी मार्केट शेअर संपादित केला. महाराष्‍ट्रात या कालावधीदरम्‍यान ब्रँडच्‍या एकूण कार विक्रीमध्‍ये ३४ टक्‍के सीएनजी वेईकल्‍स होत्‍या, ज्‍यामधून प्रबळ प्रादेशिक वाढ दिसून येते. टाटा मोटर्सची शाश्‍वत गतीशीलतेप्रती कटिबद्धता विकसित होत असलेल्‍या ऑटोमोटिव्‍ह लँडस्‍केपशी जुळवून घेण्‍याच्‍या त्‍यांच्‍या सक्रिय दृष्टिकोनामधून दिसून येते. टिएगो, टिगोर, नेक्‍सॉन, अल्‍ट्रोज आणि पंच असे लोकप्रिय मॉडेल्‍स सीएनजी…

Read More

पार्ले महोत्सव २०२४ ची चाहूल;  २१ डिसेंबरपासून शानदार आयोजन महोत्सवातील सहभागासाठी स्पर्धकांची नावनोंदणी सुरु दिनांक –१६/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- केवळ पार्लेकरच नव्हे तर संपूर्ण मुंबई परिसरातील सांस्कृतिक, क्रिडा, कला क्षेत्राचे आकर्षण असलेल्या बहुप्रतिक्षित पार्ले महोत्सव २०२४ आमदार पराग अळवणी यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली विलेपार्ले येथे २१ ते ३० डिसेंबर २०२४ या कालावधीत होत आहे. यंदाचे हे २४ वे वर्ष असून या महोत्सवाची रौप्यमहोत्सवी वाटचाल अधिक जोमाने सुरु आहे. या महोत्सवात विविध वयोगटात वैयक्तिक आणि सांघिक अशी सुमारे ३५०० पारितोषिके असून ६० हजारांहून अधिक स्पर्धक सहभागी होतील, असा प्राथमिक अंदाज आहे. साठ्ये महाविद्यालय संकुल, दुभाषी मैदान तसेच विविध ठिकाणी त्याचे आयोजन…

Read More

दिनांक –१६/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- राष्ट्रीय लोकअदालत कार्यक्रमांला मुंबईतील लघुवाद न्यायालयात उत्तम प्रतिसाद मिळाला असून १८३ पैकी २१ प्रकरणं निकालात निकाली आहेत. त्यामुळे अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या खटल्यातील न्यायप्रक्रियेतील कार्याला या उपक्रमामुळे गती येत असल्याचे दिसून येत आहे. गिरगावच्या प्रसिद्ध केशवजी चाळीतील काही वर्षे प्रलंबित असलेले एक प्रकरणदेखील निकालात निघाले आहे. लघुवाद न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्रीकांत एल आणेकर व अतिरिक्त मुख्य न्यायाधीश श्रीमती ए. एस. खडसे, यांच्या मार्गदर्शनाखाली लोकअदालतचे काम अतिरिक्त मुख्य न्यायाधीश एस. एस. देशपांडे, न्यायाधीश ए. एस. पंडागळे आणि ए. जे. फटाले, वकील अस्वीनी सिंग आणि पी. पी. तवसाळकर यांनी यशस्वी केले. या उपक्रमाचे यशस्वी आयोजन अप्पर प्रबंधक अतुल…

Read More

                     दिनांक –१६/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- विनय क्षीरसागर यांची ०१ डिसेंबर २०२४ पासून आय आर क्लास सिस्टम्स अँड सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक – (मॅनेजिंग डायरेक्टर)  पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सागरी उद्योग आणि चाचणी, तपासणी आणि प्रमाणता सेवा उद्योगांमध्ये त्यांना पस्तीस वर्षांपेक्षा जास्त समृद्ध अनुभव आहे, त्याद्वारे श्री विनय क्षीरसागर व्यवसायात वाढ, नाविन्य आणि ऑपरेशनल कार्यक्षमतेमध्ये निपुणता आणणे साध्य करतील.                        ते आयएसएसपीएलला चाचणी, तपासणी, शाश्वतता आणि डिजिटल सोल्यूशन्स यासह अनेक क्षेत्रांमध्ये व्यवसाय वाढवण्याच्या दिशेने मार्गदर्शन करतील. आयआरक्लास…

Read More

दिनांक –१६/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- ग्राम शिक्षण सेवा मंडळ धोलवड या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष भालचंद्रशेठ सोपानबुवा नलावडे यांना वै. ह. भ. प. कोंडाजीबाबा डेरे वारकरी पुरस्कार हा श्री क्षेत्र विठ्ठलवाडी, पिंपळगांव सिद्धनाथ, (ता. जुन्नर) येथे ह. भ. प. गुरुवर्य जेष्ठ किर्तनकार प्रमोद महाराज जगताप यांचे शुभहस्ते प्रदान करण्यात आला. या प्रसंगी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन  अशोकदादा घोलप, जनसेवा ट्रस्टचे अध्यक्ष श्री. कृष्णा खंडागळे, तालुक्यातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर, नवी मुंबई फळ बाजार येथील अनेक फळव्यापारी हजर होते. धोलवड गावातील अनेक ग्रामस्थ, पिंपळगांव सिद्धनाथ, विठ्ठलवाडी ग्रामस्थ, परीसरातील बंधू भगिनी बहुसंख्येने ऊपस्थित होते. आळंदी येथील सदगुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या विश्वस्थ…

Read More