दिनांक – ०१/१०/२०२५,गणेश पुजारी,मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:-दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांचे जीवन वाहिनी अर्थात मुबंई लोकलची अंबरनाथ, उल्हासनगर, विठ्ठलवाडी येथील प्रवाशांनी अंबरनाथ येथून ०८:४९ मिनीटांनी सुटणारी अंबरनाथ-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ला जाणाऱ्या लोकल ट्रेनची सजावट करत दसरा आनंद उत्सव साजरा केला.रेल्वे प्रवाशांसाठी लोकल आणि रेल्वे प्रशासनाचे आभार व्यक्त करण्याचा सोहळा म्हणून दसऱ्याच्या आदल्या दिवसांकडे पाहिलं जातं दसऱ्याच्या आदल्या दिवशी अंबरनाथ, उल्हासनगर, विठ्ठलवाडी रेल्वे प्रवाशांनी उत्साहात दसरा साजरा केला.
ग्रुप मधील सर्व प्रवाशांनी स्वइच्छेने वर्गणी काढून रेल्वेतील आपल्या डब्याची रंगीबेरंगी पताका फुगे आणि फुलांची आरास करून प्रवाशांनी लोकलचे डबे सजवले इतकच नाही तर लोकलचे पूजन करून मोटार मन तसंच गार्डचे आभारही व्यक्त करण्यात आले. आपले दैवत गणपती बाप्पा ,देवीची आरती करून ट्रेन मधील ग्रुपसाठी खास गाऱ्हाणे घालून नंतर प्रसाद वाटप झाले. सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा देत ग्रुप साठी आणलेला अल्पोहार (नास्ता)चे सर्वाना वाटप करण्यात आले.
मुंबईची लोकल ट्रेन या लाखो लोकांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग म्हणून गेलीये म्हणूनच दसऱ्याच्या आधी एक दिवस लोकल ट्रेन पूजा करण्याची प्रथा गेली अनेक वर्ष सुरू आहे.