दिनांक – १०/१०/२०२५ गणेश पुजारी,गर्जा महाराष्ट्र न्यूज :- वाढदिवस साजरा करण्याच्या पद्धती अनेक असल्या तरी उल्हासनगरातील विठाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप गरड यांनी आपला वाढदिवस साजरा करण्याचा जो आदर्श ठेवला, तो समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे.
गरड यांनी आपल्या मित्रपरिवार, नातेवाईक आणि सहकाऱ्यांना आवाहन केले की, “माझ्या वाढदिवसानिमित्त शाल, हार, बुके न आणता पूरग्रस्त शेतकरी बांधवांना मदत करा.” त्यांच्या या भावनिक आवाहनाला समाजातील अनेकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या सामाजिक भावनेतून दशरथ गायकवाड, नितीन सपकाळे, निलेश बोबडे, बंसराज विश्वकर्मा, हरी शिंदे, पिंटू भालेराव, विजय गायकवाड, कृष्णा साळुंखे, सुनील सोनवणे, राजू गायकवाड, पुष्पक फेगडे, अजय वाखरकर, साई ग्राफिक्स, सागर जाधव, आकाश वाघमारे, मनीष वलेचा, निखिल बिजवे, बाळासाहेब वायकर, अब्दुल अन्सारी, अनिल चव्हाण, हेमंत जाधव आदींनी अन्नधान्य, शालेय गणवेश आणि शैक्षणिक साहित्य सुपूर्द केले.

संकलित साहित्य प्रदीप गरड यांनी सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील रिधोरे गावातील शेतकरी बांधव आणि त्यांच्या मुलांना वितरित केले. या उपक्रमात २०० किट किराणा साहित्य, शैक्षणिक साहित्य आणि कपड्यांचे वाटप करण्यात आले.

रिधोरे गावाचे सरपंच सौदागर गायकवाड आणि रिधोरे ग्रा पंचायत सदस्य बिटुभाई गायकवाड रिधोरे ग्रा पंचायत सदस्य अमजद शेख शाहीर शेख सोसायटी सदस्य नाना गायकवाड सोसायटी सदस्य गेजेद्र शिंदे सौदागर गायकवाड सरंपच रिधोरे लखन कसबेग्रामस्थांच्या उपस्थितीत हा सामाजिक उपक्रम पार पडला. यावेळी विठाई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप दिलीप गरड, संतोष बंडेवर, दशरथ गायकवाड, अशोक गरड, जितू अशोक मुंडे, सचिन वायकर जितू शिरसाठे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमातून प्रदीप गरड यांनी दाखवून दिले की, > “वाढदिवस साजरा करण्याची खरी मजा म्हणजे दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणे!”

Share.