दिनांक – २१/०१/२०२६,मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज: परिमंडळ ०२ च्या परिक्षेत्रात (०१) व्ही.पी.रोड पो.स्टे (०२) एल.टी मार्ग पो.स्टे हद्दीत मंगलदास मार्केट,काळबादेवी या भागात क्रॅश लॉटरी,कच्चा चिठ्ठी ची दुकाने मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मंगलदास मार्केट,काळबादेवी हा दैनंदिन वर्दळीचा भाग आहे.होलसेल व रिटेलच्या व्यापाऱ्यांचे मोठ-मोठे दुकाने या ठिकाणी आहेत. या भागात हमाल व कामगार वर्ग हजारोच्या संख्येने काम करतात.या सर्व कामगार वर्गाची तसेच छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांची दिशाभूल करून अति पैशाचे लालच देऊन ही लॉटरी विकली जाते.
या लॉटरीला शासनाची परवानगी नाही. दररोज लाखो रुपयांची उलाढाल यांची आहे. दुकानाच्या बाहेर परवानगी असलेल्या लॉटरीचे बोर्ड लावलेले असतात पण सत्य परिस्थिती अशी आहे की परवानगी नसलेल्या लॉटरी ही त्यांच्याकडे असतात.सदर दुकानांना नावे नाही म्हणून आजू बाजूच्या दुकानाची नावे सोबत घेऊन संपुर्ण पत्ता सहित या ठिकाणी खालील दुकाने आहेत. (०१) गणेश पान-बडी शॉपच्या बाहेर , फिदा मेन्शन, मंगलदास मार्केट समोर,झवेरी बाजार, मुंबई, महाराष्ट्र 400002,(०२) काळबादेवीचा चिंतामणी, 329/331 दुसरी बदाम वाडी, काळबादेवी रोड,हसमुख राय चहा कंपनी जवळ, मुंबई,महाराष्ट्र 400002,(०३) एकांश पार्टी वेअर दुकानाच्या बाजूला, काळबादेवी रोड, मरीन लाईन्स ईस्ट, चंपा वाडी, काळबादेवी, मुंबई, महाराष्ट्र 400002, (०४) पारसी डेरीच्या समोर शामलदास गांधी मार्ग, नवजीवन वाडी, सोनापूर, मरीन लाईन्स , मुंबई, महाराष्ट्र 400002 (०५) मापाला इमारत, सॅम्युअल स्ट्रीट क्रॉस लाईन, वडगादी समोर, मांडवी कोळीवाडा, जुनी बारदान स्ट्रीट, मुंबई, महाराष्ट्र 400003.
याबाबत सविस्तर गर्जा महाराष्ट्र न्यूज समूहाचे मुख्य संपादक तथा वरिष्ठ पत्रकार श्री.अनिल महाजन हे मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती साहेब यांची लवकरच भेट घेणार आहेत. लॉटरी संदर्भातले सर्व ऑडिओ, व्हिडिओ क्रॅश लॉटरी, कच्ची चिठ्ठी या लॉटरीचा पुरावा घेऊन मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याकडे देणार आहेत. सदर दुकान पैकी काही दुकानाचे फोटो सोबत जोडत आहे.
संबंधित पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी यावर काय कार्यवाही करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

