उपायुक्त दर्जाच्या वरिष्ठ अधिकारी कोण जो निलेश संखेना घालतोय पाठीशी संखेने नुकतेच कोणाला दिले दोन लाखांचे दिवाळी पॅकेट? याबाबत पालिकेत चर्चा…
निलेश संखे यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप उद्यान विभाग,वृक्ष प्राधिकरण आणि पर्यावरण विभागात अनेक भ्रष्टाचार.
दिनांक – १३/१०/२०२५, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत भ्रष्टाचार आणि नेहमीच वादग्रस्त सेटिंग बाज अधिकारी म्हणून ओळखले जाणारे श्री.निलेश संखे ही नेहमी चर्चेत असतात. श्री.निलेश संखे यांच्याकडे अंदाजे तीन ते चार खात्याचा अतिरिक्त पदभार आहे. यांच्याविरुद्ध अनेक सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांनी निवेदन देऊन आवाज उठवला आहे. परंतु त्यांच्यावर कार्यवाही काहीच केली नाही. याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.कोण उपायुक्त दर्जाच्या वरिष्ठ अधिकारी आहे.जो नेहमी यांना पाठीशी घालतो. श्री.निलेश संखे यांनी गणपती विसर्जन कृत्रिम तलावात ठेकेदाराकडून मोठी आर्थिक रक्कम घेऊन. निकृष्ट दर्जाचे कृत्रिम तलाव भिवंडी शहरात उभारले होते. तसेच यांनी औषध फवारणी यातही भ्रष्टाचार केला आहे.
श्री.निलेश संखे यांच्याकडे पर्यावरण विभाग प्रमुख ही मोठी महत्त्वाची जबाबदारी आहे. त्यामुळे शहरातील सायजिंग डाईंग अनेक विविध कंपन्यांची त्यांचे मोठे साटे-लोटे आहे. लाखो रुपयाचा आर्थिक देवाणघेवाणीला रस्ता मोकळा झाल्याचे या ठिकाणी दिसून येत आहे. तसेच भिवंडी शहरात मोठ-मोठ्या बिल्डिंग कन्स्ट्रक्शन सुरू आहेत. त्या ठिकाणी पर्यंत बिल्डिंग मध्ये वृक्षारोपण प्लांट उभारण्यासाठी किंवा वृक्ष प्राधिकरणाचा ना हरकत दाखला (NOC) देण्याचे काम श्री.निलेश संखे यांच्याकडे असल्याचे कळते. नुकतेच तीन ते चार दिवसांपूर्वी भिवंडीतील मोठ्या बिल्डर कडून असेच एक ना हरकत प्रमाणपत्र घेण्यासाठी त्यांच्याकडून अंदाजे चार ते पाच लाख रुपये घेतल्याचे खात्रीशीर सूत्रांची माहिती आहे. या रक्कम पैकी त्याने पन्नास टक्के रक्कम ही एका उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांना दिल्याचे कळते याबाबत खात्रीशीर सूत्रांची माहिती आहे.अशा प्रकारच्या भोंगळ कारभार पर्यावरण विभागात श्री.निलेश संखे हे करत आहेत.
भिवंडी मनपातील भ्रष्ट अधिकारी श्री निलेश संखे यांचे कारवाई करून पर्यावरण ह्या विभागात सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक होईल का ?
1. अमृत योजनेंतर्गत आजतागायत किती झाडे लावण्यात आलेली आहेत आणि किती खर्च झालेला आहे. याबाबत निधीचा दुरुपयोग झालेला आहे याची चौकशी होईल का ?
2. भिवंडी शहरामध्ये आतापर्यंत वृक्ष सवंर्धन आणि वृक्ष रोपण कामी झालेला खर्च आणि प्रत्यक्षात जगलेली वृक्ष याबाबत माहिती मिळावी.सदर कामी तत्कालीन आयुक्त श्री पंकज आशिया यांनी संबंधित प्रकरणी श्री निलेश संखे यांना निलंबित केले होते तरीदेखील सध्यस्थितीत याच विभागात पुन्हा बदली करून आणि प्रशासनामार्फत कोणतेही दखल घेत नाही .
3. मागील 10 वर्षात शासनाने मंजूर विविध योजनेतून झालेला खर्च आणि प्रत्यक्षात झालेला काम याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे समजते याबाबत चौकशी करून संबंधित अधिकारी श्री.निलेश संखे यांवर कारवाई करणे अपेक्षित आहे.
4. मला प्राप्त माहिती नुसार श्री निलेश संखे उद्यान अधीक्षक पदाचा दुरुपयोग करून उद्यान, मियावकी उद्यान आणि वृक्ष रोपण आणि सवंर्धन करिता प्राप्त शासन निधी मध्ये खूप भ्रष्टाचार केलेला असून याबाबत प्रशासन
कधी चौकशी करणार आहे.
5. भिवंडी शहरात असलेली उद्याने विकसित करणेकामी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला असून कोट्यवधी खर्च झालेला असून अजूनदेखील नागरिकांसाठी पूर्णपणे विकसित झालेली नाहीत . तसेच दिवाण शाह येथील या उद्यानाकरिता रु 76 लाख आणि धोबी तलाव जवळ उद्यान विकसित करिता 46 लाख खर्च केलेला असून याठिकाणी उद्यान अस्थित्वातच नाहीत. याबाबत स्थानिक पत्रकार वारंवार तक्रारी करत आहेत.
6. वरील बाब अतिशय गैर जबाबदार असून शासन निधीचा गैर वापर करून फसवणूक करणारी आहे. याबाबत प्रशासनाने गंभीर दखल घेऊन श्री निलेश संखे यांना त्वरित कारवाई करावी.
7. श्री निलेश संखे यांनी पर्यावरण विभागाचा अतिरिक्त कार्यभार मिळाल्यापासून शहरातील डाईंग आणि सायझिंग कारखाने यांचेमार्फत आर्थिक व्यवहारापोटी नोटीस बजावून शुल्क भरून देखील ना हरकत दाखला दिला जात नाही याबाबत डाईंग व सायझिंग असोसिएशन मार्फत तक्रारी आहेत.
8. नजीकच्या काळात भिवंडी महानगरपालिकेच्या उद्यान विभागातील एक कर्तव्यआणि इमानदार बाग कामगार “जगदीश शिवाजी मोटे” हे आपले कर्तव्य बजावत असतानाच धारातीर्थी पडले. अतिश्रमामुळे त्यांचा मृत्यू झाला असून श्री निलेश संखे यांनी सतत दिलेल्या दबावामुळे आणि कामावरून निलंबित करण्याच्या धमकी मुळे हा प्रकार घडला आहे. यासारखे अनेक प्रकार यापूर्वी सतत उद्यान विभागात झालेला आहे परंतु कामगार दबावामुळे कोणाकडेही तक्रार करू शकत नाही.
9.गणेशोस्तव २०२५ करीता शासनाच्या आदेशान्वये कृत्रिम तलाव भाडे तत्वावर पुरविनेत आलेले आहेत ते निकृष्ठ दर्जाचे असल्यामुळे दीड दिवस विसर्जनापूर्वीच निकामी झालेले आहेत. याबाबत अनेक स्थानिक वृत्तपत्रात नाराजी व्यक्त झालेली असून प्रशानामार्फात कोणतेही दखल घेतलेली नसल्याचे दिसून येते. श्री. निलेश संखे यांनी यावर्षी एकूण १० ठिकाणी नवीन कृत्रिम तलाव पुरविणे बाबत ठेकेदारास 20 लाखात काम दिलेले असल्यचे समझते विशेष म्हणजे सदर कृत्रिम तलाव हे मनपा मालकीचे नसून फक्त भाडे तत्वावर तात्पुरत्या कामकाजाकरिता पुरविले आहेत.तरी सुद्धा इतका खर्च कसा झाला याबाबत सखोल चौकशी करणेत यावी. तसेच सदर कृत्रिम तलाव किती खर्च अपेक्षित आहे याबाबत प्रशासनाने चौकशी करणे आवश्यक आहे. इतका खर्च करून देखील विसर्जनावेळी या कृत्रिम तलावाचा काहीही फायदा झालेला नाही. फक्त डीड दिवस पाच दिवस आणि दहा दिवस विसर्जनाकरिता वेळेवर पुरविण्याकरिता इतका खर्च mhऔषध, केमिकल फवारणी तसेच मूर्ती विसर्जन करिता विविध केमिकल याकरिता जवळपास 15 लाख रुपये खर्च केलेले आहेत परंतु प्रत्यक्षात अतिशय कमी प्रमाणात औषध फवारणी केलेली आहे. याबाबत प्रशासन प्रत्यक्ष भाजारभाव आणि खर्च याबाबत चौकशी कारावी.कारण सदर कृत्रिम तलाव यांची किंमत फक्त 50 ते 60 हजार असून अतिशय कमी असून तुलनेने खूप जास्त खर्च झालेला आहे. सध्यस्थितीत वर्हाळा देवी तलाव अतिशय प्रदूषित झालेला असून अतिशय घाण आणि दुर्घधी आल्याने नागरिक त्रस्त असून आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत त्याकरिता दुर्गंधी आणि घाण यांवर टँकर द्वारे औषध फवारणी करणे आवश्यक असताना कोणतीही दखल घेतली जात नाही. म्हणून श्री निलेश संखे यांची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.
10.महानगरपालिकेमार्फत सण 2025 मध्ये एकूण अंदाजित 750 मूर्ती या कृत्रिम तलावात विसर्जन झाल्या असून या सर्व मूर्ती विघटन कामी मनपाच्या कोंडवाडा येथे जमा केलेल्या असून यावर प्रक्रिया करणेकामी लाखो रुपये खर्च करून देखील अद्याप गणेश मूर्ती विघटन न करता कोंडवाडा येथेच उघड्या पडलेल्या होत्या. हि बाब अतिशय धार्मिक विटंबना करणारी असून केवळ आर्थिक हितापोटी फक्त कागदावर किंवा महानगरपालिकेच्या आर्थिक नुकसान करणारी आहे. तरी कृपया सदर प्रकरणी आपण व्यक्तिशः लक्ष देऊन चौकशी करावी.
11. श्री.निलेश संखे यांचेकडे उद्यान विभाग , वृक्ष प्राधिकरण आणि पर्यावरण विभागाचा अतिरिक्त कार्यभार असून कामकाज करणेस असक्षम असल्याने त्वरित बदली करून सक्षम अधिकारी यांची नियुक्ती करावी. अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहे.
अनिल महाजन.
चेअरमन / मुख्य संपादक :- गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनल.