दिनांक – १३/१०/२०२५, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- कल्याण एम.पी.सी.बी अंर्तगत अनेक बेकायदेशीर कारखाने आहेत त्या मधून कल्याण एम.पी.सी.बी कार्यालयाला करोडो रुपयांचा मासिक हप्ता जातो? अनेक अधिकारी करोडपती होऊन प्रमोशन घेऊन पुन्हा पदाचा दुरुपयोग करत आहेत हेड ऑफिस मध्ये बसून.
कल्याण एम.पी.सी.बी कार्यालय हे खूप मोठे आर्थिक व्यवहाराचे केंद्र मानले जाते.या कार्यालयाकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झालेले आहे.या ठिकाणी फिल्ड ऑफिसर असतील किंवा छोट्यातल्या छोटे अधिकारी असतील हे स्थानिक कारखानदारांकडून जोरदार धम्माल वसुली करत आहे.यांच्यावर कोणाचे नियंत्रण नाही.
नुकतेच एम.पी.सी.बी कार्यालय सायन येथे नवनिर्वाचित सदस्य सचिव देवेंद्र सिंग यांच्यासमोर खूप मोठे आव्हान कल्याण एम.पी.सी.बी कार्यालय आहे.कल्याण एम.पी.सी.बी साठी नवीन रणनीती देवेंद्र सिंग कशी आखतील आणि कर्तव्यदक्ष अधिकारी कसे नेमणूक करतील यावर जनतेचे लक्ष लागले आहे.
ठाणे जिल्हा हा एशियाचा सर्वात मोठा रेसिडेन्सी झोन आहे आणि या झोन मध्येच खूप मोठे-मोठे कारखाने अनाधिकृत कंपन्या मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे.कल्याण एम.पी.सी.बी कार्यालयातील अधिकारी फक्त पैसा जमा करण्याकडे लक्ष केंद्रित करत आहे. बाकी कुठलेही ठोक काम किंवा कार्यवाही करताना हे लोक दिसत नाही.यासाठी गर्जा महाराष्ट्र न्यूज या चॅनलच्या टीमने कल्याण एम.पी.सी.बी कार्यालय अंतर्गत येणाऱ्या सर्व तालुक्यातील,गावातील विभागाचा सर्वे केला गोपनीय माहिती जमा केली तरी यामध्ये खूप मोठे गौडबंगाल दिसून आले मोठ-मोठ्या कंपन्या, कारखाने ,जीन्स फॅक्टरी तसेच अनेक बेकायदेशीर केमिकल्स कंपन्या गोडाऊन मोठ्या प्रमाणात आढळून आलेले आहेत.यावर कल्याण एम.पी.सी.बी कार्यालय कुठली ठोस कारवाई करताना दिसून येत नाही.तसेच वाडा येथेही अनेक कंपन्यांना पुन्हा रिस्टार्ट पैसे घेऊन देण्यात येत आहे अशी माहिती मिळाली आहे. पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे या सर्व गोष्टींवर लवकरच लक्ष देतील असे यावेळी प्रदूषण मंत्री कार्यालयातून सांगण्यात आले. गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनलची लवकरच दखल घेतली जाईल असे मंत्रालय स्तरावर सांगण्यात आले. एम.पी.सी.बी कार्यालय सायन हेड ऑफिस येथेही अनेक काही भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे त्याकडेही लक्ष देण्यात येईल का? असा सवाल गर्जा महाराष्ट्र न्यूज समूहाने उपस्थित केला आहे.कल्याण एम.पी.सी.बी कार्यालयात नियमांचे उल्लंघन खुलेआम होताना दिसत आहे.
तसेच कल्याण ,डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ, वाडा या भागातील फील्ड ऑफिसर यांची मालमता दिवेसंदिवस कशी वाढत आहे. या कडे हि पर्यावरण विभाग लक्ष देईल का ? कल्याण एम.पी.सी.बी कार्यालयात अनेक छोटे-मोठे अधिकारी कर्तव्यात कसूर करत आहेत.तसेच या कार्यालयात दलालांनी विळखा मोठ्या प्रमाणात घातला आहे.
अनिल महाजन.
चेअरमन / मुख्य संपादक :- गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनल.