दिनांक –१७/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. यात 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तर दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा मैदनात उतरवले आहेत. 25 जानेवारीपासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. तर फडणवीस सरकारला गंभीर इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय.मनोज जरांगे म्हणाले की, मराठा समाजाचा 15 ते 16 महिन्यापासून संघर्ष सुरू आहे. मराठ्यांची आजही एकजूट कायम आहे. आजपर्यंत सरकारने मराठा समाजाला सरसकट आरक्षण दिले जात नाही. त्यामुळे सामूहिक उपोषण करण्याचा निर्णय झाला आहे. ज्यांची उपोषणाची तयारी आहे त्यांनी यावं. 25 जानेवारीपासून पुन्हा अंतरवालीला आमरण उपोषण करणार असल्याचे त्यांनी म्हटले.

Share.