डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेने यंदाही अतिरिक्त लोकल ट्रेनची व्यवस्था केली आहे. मुंबई उपनरातील आंबेडकरी अनुयायांसाठी ही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. ५ आणि ६ डिसेंबरच्या मध्यरात्री परेल-कल्याण आणि कुर्ला-पनवेल या मार्गांवर या विशेष रेल्वे धावणार आहेत. आंबेडकरी जनतेची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे. तर महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर लाखो अनुयायांना याचा लाभ घेता येणार आहे.
अप मार्गावरील व्यवस्था कशी?
कुर्ला-परळ विशेष लोकल कुर्ला येथून रात्री १२.४५ वाजता सुटणार आहे आणि ०१.०५ ला परळ स्थानकात पोहोचणार
मुंबईबाहेरील प्रवाशांसाठी कल्याण-परळ या विशेष रेल्वेची व्यवस्था आहे, जी लोकल रात्री १ वाजता कल्याणहून सुटेल आणि २ वाजून १५ मिनिटांनी परळला पोहोचेल
ठाणे-परळ विशेष लोकल ट्रेन ठाणे येथून मध्यरात्री २ वाजून १० मिनिटांनी रवाना होईल जी परळ येथे रात्री २ वाजून ५५ मिनिटांनी वाजता पोहोचेल
मध्य रेल्वेच्या डाऊन मार्गावरही विशेष व्यवस्था
परळ-ठाणे ही विशेष लोकल रात्री १.१५ वाजता परळहून रवाना होईल जी १.५५ला ठाण्याला पोहोचेल
परळ-कल्याण विशेष लोकल ०२.२५ वाजता परळहून रवाना होईल जी पहाटे ०३.४० वाजता कल्याणला पोहोचेल
परळ-कुर्ला ही विशेष लोकल पहाटे ०३.०५ मिनिटांनी परळहून रवाना होणार जी कुर्ला येथे पहाटे ०३.२० वाजता पोहोचणार आहे
मध्य रेल्वेकडून हार्बर मार्गावरील अनुयायांसाठीही व्यवस्था
वाशी-कुर्ला ही विशेष लोकल वाशीहून रात्री १ वाजून ३० मिनिटांनी रवाना होणार जी कुर्ला येथे रात्री २ वाजून १० मिनिटांनी पोहोचेल
पनवेल-कुर्ला विशेष लोकल पनवेलहून सकाळी १ वाजून ४० मिनिटांनी रवाना होणार जी कुर्ल्याला पहाटे २ वाजून ४५ ला पोहोचेल
वाशी-कुर्ला ही विशेष लोकल वाशीहून ०३.१० ला रवाना होईल जी कुर्ला येथे पहाटे ०३.४० ला पोहोचणार आहे
हार्बर मार्गासाठीही डाऊन लाईनवरही विशेष रेल्वे
कुर्ला-वाशी ही विशेष लोकल कुर्ला येथून रात्री ०२.३०ला सुटेल जी वाशी येथे पहाटे ०३.०० वाजता पोहोचेल
कुर्ला-पनवेल ही विशेष लोकल कुर्ला येथून पहाटे ०३.०० वाजता सुटून पनवेलला पहाटे ०४.०० वाजता पोहोचेल
कुर्ला-वाशी विशेष लोकल कुर्ला येथून पहाटे ०४.०० वाजता सुटेल जी वाशीला पहाटे ०४.३५ ला पोहोचणार आहे