दिनांक –१२/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- दादरमधील प्रभादेवी सिग्नलजवळील रस्त्याचा काही भाग अचानक खचल्यामुळे तिथे खड्डा निर्माण झाला आहे. त्यामुळे त्या रस्त्याने जाणारी एक कार अडकली. प्रभादेवी सिग्नलजवळ रस्त्याच्या मधोमध ही घटना घडली. या रस्तावरून जात असलेल्या कारचा टायर अडकला. त्यामुळे येथे अचानक खूपच ट्राफिक वाढली. हा परिसर प्रभादेवी येथील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराजवळ असून, येथे गणपती उत्सवानिमित्त मोठी गर्दी होते. मुंबई पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Share.