दिनांक –१०/१०/२०२४ , गर्जा महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी (गणेश पुजारी):- बांबवडे (ता. शिराळा) जिल्हा सांगली येथील सर्व ग्रामस्थ बंधू-भगिनी यांना कळविण्यात आनंद होतो की, आपणा सर्वांच्या सहकार्याने साकार झालेल्या श्री सुयोग गणेश मंदिराचा वास्तुशांती, मूर्ती स्थापना व कलशारोहण सोहळा रविवारी दि १३/१०/२०२४ रोजी या शुभ मुहुर्तावर संपन्न होणार आहे. श्री जय सद्गुरु ष.ब्र.प्र १०८ डॉ. नीलकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज यांच्या सुवर्ण हस्ते होमहवन व मूर्ती प्राण प्रतिष्ठापणा पूर्व विधी, कलशारोहन संपन्न होणार आहे. तरी या कार्यक्रमास सहकुटुंब उपस्थित राहुन श्रींचे आशिर्वाद घ्यादे, ही नम्र विनंती. असे आवाहन श्री सुयोग गणेश मंदिर समिती, बांबवडे च्या वतीने करण्यात आले आपले आहे.
कार्यक्रमाची रुपरेषा खालील प्रमाणे
शनिवार, दि १२/१०/२०२४ रोजी दुपारी ३ ते रात्री ८ वा. श्री गणेश मूर्तीची व कळसाची भव्य मिरवणुक
रविवार, दि १३/१०/२०२४ रोजी पहाटे ५.०० वा. श्रींची मूर्ती व कलश प्राण प्रतिष्ठापनेकरिता पुरोहित श्री जय सद्गुरू ष.ब्र.प्र १०८ डॉ. नीलकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज यांच्या हस्ते होमहवन व प्राण प्रतिष्ठापना पूर्व विधी होईल.
पहाटे ६.०० वा. महापूजा २१ दांपत्यांच्या उपस्थिती मध्ये श्री महासंकल्प, गणेशपूजन, प्रधान कलश इतर मातृका व नवग्रह पूजन या सर्व पूजा होतील
सकाळी ८.०० वा.. श्री गणेश मूर्ती व कलशास मंगल रुद्राभिषेक व डोळ्याचे पारणे फेडणारा पवित्र ५२ पात्री अभिषेक होईल.
सकाळी ९ ते ११ वा. वास्तुशांती, मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना, कलशारोहन
सकाळी ११: ३० वा. स्थापत्य मूर्तीची ” महाआरती”
दुपारी १२ ते ३ वा. महाप्रसाद आयोजन
रात्री ८ ते १० वा. वासुदेव भजनी मंडळ, वाटेगांव यांचा कार्यक्रम