दिनांक –०3/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- तब्बल पंधरा वर्ष परिश्रमपूर्वक अभ्यास केल्यावर विद्यार्थ्यांना पदवी प्राप्त होते. ही पदवी विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देत असल्याचे प्रतिपादन वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. संसदीय आयुधांचा वापर करून गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठ स्थापन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या विद्यापीठाच्या प्रगतीसाठी केंद्र शासनाकडे निधीची मागणी केली असून विद्यापीठाचा विस्तार करून संपूर्ण महाराष्ट्राला हेवा वाटेल असे सुंदर विद्यापीठ येथे निर्माण करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. गुणवत्तापूर्ण शिक्षणातून विद्यापीठाचे नाव पूर्ण महाराष्ट्रात व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

विद्यापीठाने मला डी. लिट. पदवी देऊन माझा सन्मान केल्यामुळे डॉक्टरेट मिळविण्याचे वडीलांचे स्वप्नपूर्ती झाल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला विद्यापीठाच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे यांनी प्रास्ताविकेत विद्यापीठाच्या प्रगती अहवालाचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नरेंद्र आरेकर व डॉ. अपर्णा भाके यांनी केले तर उपस्थितांचे आभार कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी व्यक्त केले.

दीक्षांत समारंभामध्ये सन 2022-23 या शैक्षणिक वर्षामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी, कॉमर्स अँड मॅनेजमेंट, ह्युमॅनीटीज आणि इंटरडीसीप्लीनरी स्टडीज विद्याशाखेमधील यु. जी. व पी. जी. मध्ये प्रदान करण्यात आलेल्या पदवीची संख्या 10 हजार 226 इतकी असून 55 विद्यार्थ्यांना पीएच डी. तर 41 विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले.

सन 2023-24 या शैक्षणिक वर्षामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी, कॉमर्स अँड मॅनेजमेंट, ह्युमॅनीटीज आणि इंटरडीसीप्लीनरी स्टडीज विद्याशाखेमधील यु. जी. व पी. जी. मध्ये प्रदान करण्यात आलेल्या पदवीची संख्या 13 हजार 607 इतकी असून 25 विद्यार्थ्यांना पीएच डी. , 1 विद्यार्थ्याला एम. ई. संशोधन पदवी तर 41 विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाला लोकप्रतिनीधी, प्रशासकीय अधिकारी, माजी कुलगुरु, माजी प्र-कुलगुरु, अधिसभा सदस्य, दानदाते, विशेष आमंत्रित, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share.