दिनांक –२१/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- लिव्हप्युअर या भारतातील आघाडीच्या ग्राहक-केंद्रित ब्रँडने दुसऱ्या तिमाहीतील प्रभावी निकालांची घोषणा केली आहे, जेथे गेल्या वर्षीच्या तुलनेत दुस-या तिमाहीत महसूलामध्ये ५० टक्के वाढीची नोंद केली आहे. नाविन्यपूर्ण उत्पादन लाँचेस, धोरणात्मक विपणन गुंतवणूका आणि सणासुदीच्या काळात सुरूवातीपासून झालेली वाढ या बाबींना या वाढीचे श्रेय जाते. कंपनीचे व्हॅल्यू इंजीनिअरिंग व परिवर्तनामध्ये सुरू असलेल्या प्रयत्नांचे फळ मिळत आहे, ज्यामुळे लिव्हप्युअरला बाजारपेठेत अग्रगण्य स्पर्धात्मक स्थान मिळाले आहे.
विविध विभागांमध्ये प्रबळ कामगिरीमुळे दुस-या तिमाहीत लिव्हप्युअरच्या वाढीला गती मिळाली, जेथे जनरल ट्रेड महसूलाने प्रभावी ५५ टक्के वाढ केली. ई-कॉमर्स व जनरल ट्रेडने एकत्रित ६६ टक्के वाढीची नोंद केली, तर मॉडर्न ट्रेड विभागाने १५० टक्के वाढीची नोंद केली. सर्विस श्रेणीमध्ये, महसूल ४० टक्क्यांनी वाढला आणि लिव्हप्युअरची प्रमुख श्रेणी म्हणजेच वॉटर प्युरिफायर्सने ३८ टक्के वाढीची नोंद केली, यामधून उच्च दर्जा व सेवेच्या माध्यमातून ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करण्याप्रती ब्रँडची कटिबद्धता दिसून आली.
या टॉप-लाइन विस्तारीकरणामुळे ईबीआयटीडीएमध्ये उल्लेखनीय वाढ दिसण्यात आली, जे गेल्या वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत २७१ टक्क्यांनी वाढले आणि तिमाही-ते-तिमाही ४०० बेसिस पॉइण्ट्स सुधारणा केली. या वाढीमधून लिव्हप्युअरची प्रभावी कार्यरत धोरणे आणि वाढत्या मागणीप्रती कार्यक्षम प्रतिसाद दिसून येतो, ज्यामुळे कंपनी उच्च लाभक्षमतेसाठी कार्यरत कार्यक्षमतांचा फायदा घेण्यास सक्षम झाली आहे.
कंपनीच्या सातत्यपूर्ण विकासगतीबाबत आशा व्यक्त करत लिव्हप्युअरचे व्यवस्थापकीय संचालक श्री. राकेश कौल म्हणाले, “आमच्या दुस-या तिमाहीमधील निकालांमधून लिव्हप्युअरचा परिवर्तनात्मक प्रवास दिसून येतो, जो नाविन्यता व कार्यसंचालन उत्कृष्टतेच्या पायावर डिझाइन करण्यात आला आहे. आम्ही ग्राहकांशी संलग्न होणारी उत्पादने विकसित करण्याप्रती कटिबद्ध आहोत, ज्यांना आमच्या प्रबळ गो-टू-मार्केट धोरणाचे पाठबळ आहे. आम्ही या तिमाहीत संपादित केलेल्या प्रबळ निकालांमधून आम्हाला भविष्यात देखील शाश्वत विकासाला चालना देण्याच्या आमच्या क्षमतेबाबत अधिक आत्मविश्वास मिळाला आहे.’’