दिनांक –१७/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- मी काही लल्लू पंजू आहे का ? मकरंद पाटीलला मंत्री करण्यासाठी मला राज्यसभेवर पाठवायचं मी मूर्ख आहे का? असे म्हणत भुजबळांनी अजित पवारांना सुनावले आहे. तसेच ते स्वत:ला सर्वांपेक्षा जास्त हुशार आणि जास्त शहाणे समजतात असाही टोला लगावत भुजबळांनी आपल्या मनातील खदखदच व्यक्त केली आहे.

छगन भुजबळ म्हणाले, मकरंद पाटीलला मंत्री करण्यासाठी मला राज्यसभेवर पाठवायचं मी मूर्ख आहे का? मी काही लल्लू पंजू आहे का?तुम्ही शब्द दिला म्हणजे काहीही करायचं का ? काय तर म्हणे…दादाचा वादा … माझा लढा मंत्रिपदाचा नाही अपमान आणि अस्मितेचा आहे. मी असा वादा वगैरे मानत नाही ही लोकशाही आहे. देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या मंत्रीपदासाठी आग्रह धरला मात्र ऐकलं नाही . कारण हे सर्वांपेक्षा जास्त हुशार जास्त शहाणे समजतात.मी कुठेही जाणार नाही उद्या सर्वांचं म्हणणं ऐकून घेणार मग बघू .पुन्हा सगळं शून्यातून निर्माण करू .

Share.