दिनांक –३०/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- भारतीय सैन्यदलाने पाकिस्तान हद्दीत घुसून सर्जीकल स्टाईकद्वारे अतिरेक्यांचा खात्मा केला. भारतीय सैन्याच्या या अभिमानास्पद कामगिरीबद्दल माजी सैनिकांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी दि.29 सप्टेंबर रोजी शौर्य दिन साजरा करण्याचे राज्य शासनाने निश्चित केले आहे.

त्यानुषंगाने रविवार, दि.29 सप्टेंबर 2024 रोजी जंजिरा सैनिकी विश्रामगृह गोधळपाडा, अलिबाग येथे सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 या वेळेत जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, युध्द विधवा, विर माता व वीर पिता यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा यथोचित सत्कार करण्यात येणार असून जिल्हयातील सर्व माजी सैनिक,विधवा, युध्दविधवा, वीरमाता, वीर पिता यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रायगड-अलिबाग यांनी केले आहे.

Share.