दिनांक –०3/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- जल जीवन मिशनची संपूर्ण राज्यात यशस्वी अंमलबजावणी होत असून यामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा मोठा सहभाग आहे. ‘हर घर जल’ योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत दररोज ५५ लिटर पिण्याचे पाणी देण्याचे उद्दिष्ट ठेवून मोठे काम होत आहे. कॉफी टेबल बुक च्या माध्यमातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची विकास कामे व वाटचालीची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केला आहे. कॉफी टेबल बुकचे प्रकाशन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज मंत्रालयात केले. यावेळी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रकाशन प्रसंगी आमदार दीपक चव्हाण, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, राज्य पाणीपुरवठा व स्वच्छता मिशनचे व्यवस्थापकीय संचालक ई. रवींद्रन, माजिप्रचे मुख्य अभियंता प्रशांत भामरे यांच्यासह जल जीवन मिशन व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अधिकारी उपस्थित होते.