दिनांक –१५/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- भायखळा, मदनपुरा येथील जुन्या इमारतींचा पुनर्विकास करून येथील कुटुंबांना सुरक्षित घरे देण्याचा माझा प्रयत्न असून यासाठी सुधारीत गृहनिर्माण धोरणाचा अभ्यास मी करत आहे. या सुधारीत गृहनिमारण धोरणानुसार येथील जुन्या चाळींचा पुनर्विकास करता येणे शक्य आहे. एवढेच नाही
भायखळा विधानसभा ड्रग विळख्यात आहे. हा परिसर ड्रग मुक्त करून या व्यसनाच आहारी गेलेल्या तरुणांसाठी रिहॅबसेंटर बनवण्याचा माझा विचार आहे. जे जे रुग्णालय लॅबच्या एका रिकाम्या जागेत या अमली पदार्थांचय आहारी गेलेल्यांचे पुनर्वसन सेंटर बनवून त्यांला पुन्हा स्वत:च्या पायावर उभे करणारे हे पुनर्वसन सेंटर असेल अशाप्रकारचा प्रयत्न माझा असेल,असे भायखळा विधानसभेच्या शिवसेना भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या उमेदवार सौ यामिनी यशवंत जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले.
सौ यामिनी जाधव यांची बुधवारी सकाळी आग्रीपाडा जुनी व नवीन पोलीस लाईन येथून प्रचार फेरीला सुरुवात झाली. ही प्रचार फेरी आग्रीपाडा बी.आय.टी.चाळ, २० ते २५, बी.आय.टी.चाळ १ ते ४, दीपलक्ष्मी को.ऑ.सो., सर्वोदय नगर, सन शाईन बिल्डींग, युनाईटेड बिल्डींग, निलगिरी बिल्डींग, व १ ते ६ महानगर पालिका वसाहत, आर.बी. चांदोरकर मार्ग व सभोवतालचा परिसरात या प्रचारसभेचा समारोप झाला. या प्रचारसभे दरम्याने प्रसारमाध्यमांशी बोलतांना यामिनी जाधव यांनी बुरखा वाटप केल्यामुळे आपल्याला ट्रोल केल्याबद्दल विरोधकांचे आभार मानले.भायखळा विधानसभा क्षेत्रात सर्व धर्मिय मोठ्या संख्येने असून मी दिवाळीसह इतर सणांमध्ये हिंदुंना काहीना काही वस्तूंचे वाटप करत असते.पण मुस्लिमांना मी काही केले नव्हते. माझ्याकरता सर्व मतदार समान असून जसे मी हिंदुंना मदत करते तसेच मी मुस्लिमांनाही मदत करायला हवे याच भावनेने महिलांना बुरखाचे वाटप केले. सर्वांकडून आधार कार्ड मागवून त्याची मागणी लक्षात घेऊन हे वाटप केले आहे. त्यामुळे विरोधकांनी मला ट्रोल केले, त्यामुळे मला माझी भुमिका मांडता आली त्याबद्दल त्यांनी धन्यवाद मानले.
गरोदर महिला पोलिसांना एक महिन्यानंतर साडीचा गणवेश
महिला पोलिसांना गरोदर पणामध्ये पॅट शर्ट अशाप्रकारचा घट्ट गणवेश आणि कंबरेला पट्टा लावावा लागत असल्याने अनेक गर्भपात होण्याचे प्रकार घडत होते. ही बाब माझ्या लक्षात आल्यानंतर मी गरोदर महिलांना साडीचा गणवेश देण्याची मागणी केली. पूर्वी सहा महिन्यांनंतर साडीचा गणवेश घालण्यास परवानगी होती, परंतु विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊनच नव्हेतर जीआर काढून गरोदर महिला पोलिसांना एक महिन्यानंतर साडीचा गणवेश घालण्याची तरतूद करून दिली आहे. ज्यामुळे कंबरेला लावण्यात येणाऱ्या घट्ट पटटयांमुळे महिला पोलिसांमध्ये गर्भपाताच्या घटना होत होत्या, त्याचे प्रमाण कमी होईल. माझ्या प्रयत्नांना त्यामुळे यश आले असून त्यामुळे राज्य सरकारचे अभिनंदन आणि धन्यवादही त्यांनी यावेळी मांडले.