दिनांक –३०/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेना भोर, वेल्हा (राजगड),मुळशी विधानसभेचा विजय संकल्प मेळावा संपन्न झाला.
शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख व मुळशी पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब चांदेरे यांनी धांगवडी येथे आयोजित केलेल्या या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी,शिवसैनिक व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
भोर राजगड मुळशी हा विधानसभा मतदारसंघ स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय आनंद दिघे साहेब यांच्या विचारांना मानणारा आहे. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी राज्यात सुरू केलेल्या कल्याणकारी योजनांवर व महायुती सरकारवर विश्वास ठेवणारा मतदार संघ आहे. शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी व महायुतीतील सर्व घटक यांच्या मदतीने या विधानसभा मतदारसंघांमध्ये परिवर्तन घडविण्याचा निर्धार या मेळाव्यात करण्यात आला…!