दिनांक –०६/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज :- कल्पना करा की तुम्हाला त्वचेची देखभाल करून १ लाख रुपयांची कमाई करण्याची संधी मिळते आहे. त्वचेच्या देखभालीची नव्याने सुरुवात करत असलेल्यांसाठीचा विज्ञानावर आधारित अग्रगण्य ब्रॅण्ड, डिकन्स्ट्रक्टने “स्किनकेअर इंटर्नशिप” नावाची एक आगळीवेगळी मोहीम सुरू केली आहे. एक नवी वाट निर्माण करू पाहणाऱ्या या उपक्रमाची रचनाच मुळी स्किनकेअरच्या बाबतीत नवख्या मंडळींना स्किनकेअरच्या संकल्पनेचा शोध घेता यावा, ती आजमावता यावी यादृष्टीने करण्यात आली आहे. प्रत्येक व्यक्तीला आपला स्किनकेअरचा प्रवास सुरू करण्यासाठी सक्षम बनविण्याप्रती डिकन्स्ट्रक्टने जपलेल्या बांधिलकीचा भक्कम पाया या मोहिमेला लाभला आहे.

ही इंटर्नशिप १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींसाठी खुली आहे व त्यासाठी स्किनकेअरच्या कोणत्याही पूर्वज्ञानाची अट नाही. ही मोहीम सहभागींना एक भरभक्कम आर्थिक फायदा पुरविते आणि सातत्यपूर्ण दिनक्रमाच्या फायद्यांना आपलेसे करतानाच स्वत:च्या त्वचेशीही एक अधिक आरोग्यपूर्ण नाते विकसित करण्यासाठी प्रोत्साहित करते.

डिकन्स्ट्रक्टच्या संस्थापक आणि सीईओ मालिनी अदापुरेड्डी म्हणाल्या, “त्वचा असलेल्या प्रत्येकासाठी स्किनकेअर आहे. प्रत्येकाला, विशेषत: नवशिक्या मंडळींना आपल्या त्वचेशी एक अधिक निरोगी आणि सखोल नाते निर्माण करण्याचे निमंत्रण या संधीद्वारे दिले जात आहे. डिकन्स्ट्रक्टमध्ये आम्ही अत्यंत परिणामकारक पण त्याचवेळी अतिशय सौम्य उत्पादने बनवितो, जी स्किनकेअरची नव्याने सुरुवात करणाऱ्यांचा प्रवास सुकर बनवितात. या मोहिमेच्या माध्यमातून आम्ही त्वचेला त्रास न देणाऱ्या, उच्च कामगिरी देणाऱ्या उत्पादनांच्या साथीने स्किनकेअरचा प्रवास सुरू करण्याबद्दल वाटणारी सारी साशंकता दूर करत आहोत.”

या कार्यक्रमामध्ये ५० टक्के जागा पुरुष सहभागींसाठी राखीव ठेवल्या गेल्या आहेत व स्किनकेअर हा फक्त स्त्रियांचा प्रांत आहे या पूर्वापार चालत आलेल्या समजूतीला आव्हान दिले गेले आहे. या मोहिमेच्या माध्यमातून डिकन्स्ट्रक्ट लिंग, वय किंवा कोणत्याही पार्श्वभूमीचा अपवाद न करता प्रत्येकाला मार्गदर्शन व मदत पुरवत स्किनकेअरच्या जगाचा शोध घेण्यासाठी आमंत्रित करत आहे.

निवडक सहभागींना पर्सनलाइझ्ड स्किनकेअर वेळापत्रक व त्यांच्या त्वचेच्या विशिष्ट प्रकाराला व समस्यांना पटेल अशाप्रकारे तयार करण्यात आलेली उत्पादने पुरवली जातील. त्यांना या कार्यक्रमात कुठूनही सहभागी होता येणार असल्याने आपली नोकरी किंवा इतर कामे न सोडता या इंटर्नशिपला आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनविण्याची मोकळीक असणार आहे. या कामासाठी खास नेमलेल्या स्किनकेअर प्रशिक्षकांच्या व या उद्योगक्षेत्रातील प्रख्यात त्वचारोगतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली या प्रशिक्षणार्थींना प्रभावी स्किनकेअर सवयी तयार करण्याचा व त्या नियमितपणे जपण्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळेल.

इंटर्नशिपसाठीचे अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे, ज्यात उत्सुकता वाढविणाऱ्या तीन-टप्प्यांत पार पडणाऱ्या निवड प्रक्रियेचा समावेश आहे. नावनोंदणी आणि स्क्रीनिंगच्या फेरीपासून सुरू होणाऱ्या, व्हिडिओ सबमिशन्सच्या दुसऱ्या टप्प्यामधून जात वैयक्तिक मुलाखतींच्या तिसऱ्या फेरीशी संपणारा “स्किन इंटर्न” बनण्याचा हा प्रवास जितका तपशीलवार तितकाच फलदायी आहे. अंतिम फेरी पार करणाऱ्या सहा ते दहा इंटर्न्सच्या गटाला फक्त स्किनकेअरवर भर देणाऱ्या ३०-६० दिवसांचा सांगोपांग अनुभव मिळेल.

Share.