दिनांक –०४/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- आजच्या बैठकीत फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव माजी राज्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडला आणि त्यांना नवनिर्वाचित आमदारांचा एकमुखी पाठिंबा मिळाला. महाराष्ट्राच्या पुढील मुख्यमंत्रिपदावरील प्रदीर्घ सस्पेंस संपवत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील विधानभवनात झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत भाजप विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. या बैठकीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी उपस्थित होते.
राज्यात सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी फडणवीस यांच्यासह महायुतीच्या इतर नेत्यांनी लवकरच महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची भेट घेणे अपेक्षित आहे.
भाजपच्या संसदीय मंडळाने सोमवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची महाराष्ट्र विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती केली.
Breaking
- बारामती विमानतळावर भीषण अपघात; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन, प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरारक घटनाक्रम
- गणेश जयंतीनिमित्त बांबवडेत कार्यक्रम उत्साहात संपन्न.
- मंगलदास मार्केट,काळबादेवी मध्ये बेकायदेशीर क्रॅश लॉटरी व कच्चा चिठ्ठीचे दुकाने थाटली.
- मेंदूच्या आजाराने ग्रस्त १७ वर्षीय तरुणीचा रुग्णालयात मृत्यू; डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा आरोप करत नातेवाईकांचा आक्रोश
- पुण्यात खळबळ! नाईट शिफ्टवरून घरी परतलेल्या मुलाला दिसले आई-वडील मृतावस्थेत; कोंढव्यातील दुर्दैवी घटना
- राष्ट्रवादीशी संबंधित फर्मला गुन्हे शाखेने “भेट दिल्याने” राजकीय अटकळांना उधाण आले आहे………
- ब्रीच कँडी फ्लॅटमधून १५.४० लाख रुपयांच्या सोन्या-चांदीच्या ट्रॉफी चोरल्याप्रकरणी ओडिशातील एका घरगुती नोकराला गामदेवी पोलिसांनी अटक केली.
- “भ्रष्ट माणसांच्या हातात मुंबई देऊ नका”; तेजस्विनी पंडितचे मतदारांना कळकळीचे आवाहन

