दिनांक –१८/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- एक भारतीय मल्टीनॅशनल कार्पोरेशन आणि सरकार व नागरिकांसाठी एक प्रमुख विश्वसनीय ग्लोबल टेकनिक-सक्षम सेवा प्रदाता बीएलएस इंटरनॅशनलने ३० सप्टेंबर २०२४ रोजी समाप्त झालेल्या दुसऱ्या तिमाहीचे आणि पहिल्या सहामाहीचे एकत्रित आर्थिक निकाल जाहीर केले आहेत.
आर्थिक वर्ष २५च्या दुस-या तिमाहीत संचालनातून होणारे कंपनीचे उत्पन्न मागील वर्षाच्या तुलनेत २१.४% वाढून ४९५.० कोटी रु. झाले आहे, जे आर्थिक वर्ष २४च्या दुस-या तिमाहीमध्ये ४०७.७ कोटी रु. होते. ही वाढ मुख्यतः व्हिसा आणि कॉन्स्युलर बिझनेसमुळे झाली आहे, ज्याच्या उत्पन्नात गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल २९.६% वाढ झाली आहे. कंपनीचा एबिटा या तिमाहीत वाढून १६४.० कोटी रु. झाला आहे. जो आर्थिक वर्ष २५च्या दुस-या तिमाहीमध्ये ८६.७ कोटी रु. होता. गेल्या वर्षाच्या तुलनेत ही वाढ ८९.१% आहे.
एबिटा मार्जिन आर्थिक वर्ष २४च्या दुस-या तिमाहीमध्ये २१.३% होते, जे आर्थिक वर्ष २५च्या दुस-या तिमाहीमध्ये ११८६ बीपीएसने वाढून ३३.१% झाले आहे. मार्जिनमध्ये ही वाढ पार्टनरद्वारे चालवण्यात येणाऱ्या मॉडेलपासून स्व-व्यवस्थापित मॉडेलमध्ये सध्या होत असलेल्या रूपांतरामुळे तसेच आयडेटाच्या संपादनामुळे झाली आहे. या तिमाहीचा करोत्तर नफा १४५.७ कोटी रु आहे, जो आर्थिक वर्ष २४च्या दुस-या तिमाहीमध्ये ८२.० कोटी रु. होता. गेल्या वर्षाच्या तुलनेत ही वाढ ७७.७% आहे. दुबईतील उच्च करांमुळे एबिटा वृद्धीच्या तुलनेत करोत्तर नफा वृद्धी प्रभावित झाली. आयडेटाच्या ७२० कोटी रु. च्या संपादनानंतर ३० सप्टेंबर २०२४ रोजी कंपनीची निव्वळ रोख शिल्लक ९०२ कोटी रु झाली.
बीएलएस-इंटरनॅशनल सर्व्हिसेस लिमिटेडचे जॉइन्ट मॅनिजिंग डायरेक्टर श्री. शिखर अग्रवाल म्हणाले, “या तिमाहीत आर्थिक आणि ऑपरेशनल कामगिरीच्या बाबतीत आम्ही जबरदस्त विकास गती अनुभवली आहे आणि काही लक्षणीय टप्पे साध्य केले आहेत. आम्ही एका तिमाहितील सर्वोच्च उत्पन्न ४९५ कोटी रु., ऑपरेटिंग प्रॉफिट १६४.० कोटी रु. आणि करानंतरचा नफा १४५.७ कोटी रु. या तिमाहीत नोंदला आहे. व्हिसा अर्जांच्या संख्येतील वाढ, कोलंबिया आणि पेरू येथे सुरू झालेली नवीन व्हिसा अर्ज केंद्रे आणि आयडेटाचे संपादन ही या वृद्धीमागील मुख्य परीबळे आहेत.
पार्टनरद्वारे चालवण्यात येणाऱ्या मॉडेलपासून स्व-व्यवस्थापित मॉडेलमध्ये सध्या होत असलेल्या रूपांतरामुळे तसेच आयडेटाच्या संपादनामुळे या तिमाहीत ऑपरेटिंग मार्जिन ११८६ बीपीएसने वाढून ३३.१% इतका आजवरचा सर्वोच्च नोंदण्यात आला आहे.
सिटीझनशिप इन्व्हेस्टमधील १००% भाग संपादन करून आम्ही आमचे संचालन वाढविले आहे. सदर संपादन ऑक्टोबर २०२४ मध्ये पूर्ण झाले आणि आदिफिडेलिस सोल्यूशन्स प्रा. लि. या भारतातील एका अत्यंत मोठ्या कर्ज वितरण आणि प्रोसेसिंग कंपनीमधील ५७% इतका नियंत्रक हिस्सा संपादन करण्याचा निर्णायक करार लवकरच पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.
व्हिसा आउटसोर्सिंग उद्योगातील मोठा वाटा संपादन करण्याच्या तसेच नवीन बाजारपेठांमध्ये विस्तार करण्याच्या उद्देशासह, कंपनीने जगभरात आपल्या सेवा प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. भांडवल संवर्धनाला प्राधान्य देणाऱ्या अॅसेट-सक्षम आणि तंत्रज्ञान-चालित मॉडेलवर कार्य करत या कंपनीने सशक्त रोख प्रवाह सुनिश्चित केला आहे. धोरणात्मक संपादने कंपनीला स्थिर विकास देण्याचे काम करत राहतील ज्यामध्ये भागधारकांचे मूल्य वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल.”