दिनांक –२६/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:-  महारक्तदान शिबिर आयोजन “२००० रक्त पिशव्या संकलन करण्याचा संकल्प”

 

दसरा व दिवाळी सणांनंतर रक्ताचा तुटवडा जाणवतो,ज्यामुळे अनेक गंभीर शस्त्रक्रिया व उपचार लांबणीवर पडतात.एक रक्तपिशवी तीन व्यक्तींचे प्राण वाचवू शकते! या आवश्यकतेची जाणीव ठेवून नायर,के.ई.एम.वाडिया,सायन, मिनाताई ठाकरे व जसलोक व इतर रुग्णालयांच्या विनंतीनुसार रविवार दि.१ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ७ ते दु.३ या वेळेत श्रमिक जिमखाना मैदान,ना.म. जोशी मार्ग,लोअर परळ (पूर्व), मुंबई-१३ येथे बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघ (विभाग-लोअर परळ) व शिवशाहू प्रतिष्ठान मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने “महारक्तदान शिबिर” आयोजित करण्यात आले आहे.

 

समाजातील बांधिलकी जपत, यावर्षी २००० रक्त पिशव्यांचे संकलन करण्याचा संकल्प केला आहे. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक दात्याचे ऋण फेडणे अशक्य असले तरी, त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रत्येक रक्तदात्यास ४ भेटवस्तू देण्यात येणार आहेत.

समाजातील संवेदनशील रक्तदाते व आपल्यासारख्या जबाबदार नागरिकांच्या सहकार्यानेच हा पवित्र उद्देश साध्य होऊ शकतो.

 

चला तर मग एकत्र येऊन समाजासाठी पुढाकार घेऊया आणि अनेकांना जीवनदान देऊया!

 

पद्मविभूषण श्री. रतन टाटा यांच्या प्रेरणादायी विचारांना आणि त्यांनी केलेल्या अथक सामाजिक कार्याला अभिवादन म्हणून या वर्षीचे “महारक्तदान शिबिर”त्यांना समर्पित करण्यात येत आहे.

 

रक्तदात्यांनी अधिक माहितीसाठी संपर्क साधावा:📞

9833251642 जीवन भोसले

9920430699 निलेश मानकर

9892174413 रविंद्र देसाई

7378977969 अमर गावडे

9322433199 कृष्णा पाटील

Share.