दिनांक –२२/०१/२०२५, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:-  कर्नाटकातील बेल्लारी शहरातील एका कंपनीच्या कार्यालयासमोर काही अज्ञात लोकांनी काळी जादू केल्याची घटना समोर आली आहे. ही काळी जादू कोणी आणि कधी केली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. कंपनी तोट्यात चालत आहे, त्यामुळे 50 जणांना पदावरून काढून टाकण्यासाठी शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे. त्यापैकी एका कर्मचाऱ्याने हे कृत्य केल्याचा संशय मॅनेजमेंटला आहे. ऑफिससमोर एक काळी बाहुली, एक मोठा भोपळा, एक नारळ, 8 लिंबू, केशर आणि लाल सिंदूर पडले होते. हे पाहून कर्मचाऱ्यांनाही धक्का बसला.

Share.