दिनांक –२१/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:-  विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या निवडणुकीच्या  मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून निवडणूक यंत्रणा मतमोजणीसाठी तयार झाली आहे. याकरिता 181 मतमोजणी पर्यवेक्षक, 204 मतमोजणी सहाय्यक, 165 मतमोजणी सूक्ष्म निरीक्षक, 183 इतर पथकातील अधिकारी (वर्ग-2), 986 इतर पथकातील अधिकारी (वर्ग-3), 734 चतुर्थ श्रेणी कर्मचारी अशी एकूण 2 हजार 453 अधिकारी, कर्मचाऱ्यांची मतमोजणीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

  188-पनवेल अे.आर.कालसेकर पॉलिटेक्नीक कॉलेज,पनवेल, ठाणा नाका जवळ, कर्नाळा स्पोटर्स ॲकेडमी समोर, पनवेल येथे मतमोजणी होणार असून मतमोजणीसाठी येथे टेबलची संख्या 24 आहे. मतमोजणीच्या एकूण फेऱ्यांची संख्या 25 आहे.  मतमोजणी पर्यवेक्षक 38, मतमोजणी सहाय्यक 38, मतमोजणी सूक्ष्म निरीक्षक 38, इतर पथकातील अधिकारी (वर्ग-2) 45, इतर पथकातील अधिकारी (वर्ग-3) 310, चतुर्थ श्रेणी कर्मचारी 220 तर मतमोजणीसाठी मतमोजणी निरीक्षक म्हणून श्री.दुनी चंद्र राणा यांची  नियुक्ती करण्यात आली आहे.

 189-कर्जत प्रशासकीय भवन, पहिला मजला  कर्जत येथे मतमोजणी होणार असून मतमोजणीसाठी येथे टेबलची संख्या 14 आहे. मतमोजणीच्या एकूण फेऱ्यांची संख्या 26 आहे.  मतमोजणी पर्यवेक्षक 23, मतमोजणी सहाय्यक 29, मतमोजणी सूक्ष्म निरीक्षक 23, इतर पथकातील अधिकारी (वर्ग-2) 21, इतर पथकातील अधिकारी (वर्ग-3) 106,  चतुर्थ श्रेणी कर्मचारी 119 तर मतमोजणीसाठी मतमोजणी निरीक्षक म्हणून श्री.जगदीप धंदा यांची  नियुक्ती करण्यात आली आहे.

 190उरण दि.बा.पाटील मंगल कार्यालय,जासई येथे मतमोजणी होणार असून मतमोजणीसाठी येथे टेबलची संख्या 14  आहे. मतमोजणीच्या एकूण फेऱ्यांची संख्या 25 आहे.  मतमोजणी पर्यवेक्षक 23, मतमोजणी सहाय्यक 28, मतमोजणी सूक्ष्म निरीक्षक 23, इतर पथकातील अधिकारी (वर्ग-2) 10, इतर पथकातील अधिकारी (वर्ग-3) 90, चतुर्थश्रेणी कर्मचारी 110 तर मतमोजणीसाठी मतमोजणी निरीक्षक म्हणून श्री.राजेश कुमार आयव्ही यांची  नियुक्ती करण्यात आली आहे.

191-पेण के.ई.एस.लिटील एंजल स्कूल, पेण येथे मतमोजणी होणार असून मतमोजणीसाठी येथे टेबलची संख्या 14  आहे. मतमोजणीच्या एकूण फेऱ्यांची संख्या 27  आहे.  मतमोजणी पर्यवेक्षक 24, मतमोजणी सहाय्यक 30, मतमोजणी सूक्ष्म निरीक्षक 17, इतर पथकातील अधिकारी (वर्ग-2) 30, इतर पथकातील अधिकारी (वर्ग-3) 110,  चतुर्थ श्रेणी कर्मचारी 80 तर मतमोजणीसाठी मतमोजणी निरीक्षक म्हणून श्री.संतोष कुमार राय यांची  नियुक्ती करण्यात आली आहे.

 192-अलिबाग जिल्हा क्रीडा संकुल नेहुली-खंडाळे येथे मतमोजणी होणार असून मतमोजणीसाठी येथे टेबलची संख्या 14  आहे. मतमोजणीच्या एकूण फेऱ्यांची संख्या 27  आहे.  मतमोजणी पर्यवेक्षक 24, मतमोजणी सहाय्यक 30, मतमोजणी सूक्ष्म निरीक्षक 17, इतर पथकातील अधिकारी (वर्ग-2) 30, इतर पथकातील अधिकारी (वर्ग-3) 175,  चतुर्थ श्रेणी कर्मचारी 80 तर मतमोजणीसाठी मतमोजणी निरीक्षक म्हणून श्रीम.रुही खान यांची  नियुक्ती करण्यात आली आहे.

193-श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी कार्यालय श्रीवर्धन सभागृह,मध्यवर्ती प्रशासकीय भवन, पहिला मजला, श्रीवर्धन येथे मतमोजणी होणार असून मतमोजणीसाठी येथे टेबलची संख्या 14  आहे. मतमोजणीच्या एकूण फेऱ्यांची संख्या 25 आहे.  मतमोजणी पर्यवेक्षक 25, मतमोजणी सहाय्यक 25, मतमोजणी सूक्ष्म निरीक्षक 23, इतर पथकातील अधिकारी (वर्ग-2) 17, इतर पथकातील अधिकारी (वर्ग-3) 85,  चतुर्थ श्रेणी कर्मचारी 45 तर मतमोजणीसाठी मतमोजणी निरीक्षक म्हणून श्री.सतीश कुमार एस यांची  नियुक्ती करण्यात आली आहे.

194-महाड भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, महाड बहुउद्देशीय सभागृह येथे मतमोजणी होणार असून मतमोजणीसाठी येथे टेबलची संख्या 14 आहे. मतमोजणीच्या एकूण फेऱ्यांची संख्या 28 आहे.  मतमोजणी पर्यवेक्षक 24, मतमोजणी सहाय्यक 24, मतमोजणी सूक्ष्म निरीक्षक 24, इतर पथकातील अधिकारी (वर्ग-2) 30, इतर पथकातील अधिकारी (वर्ग-3) 110,चतुर्थ श्रेणी कर्मचारी 80 तर मतमोजणीसाठी मतमोजणी निरीक्षक म्हणून श्री.आदित्य कुमार  प्रजापती यांची  नियुक्ती करण्यात आली आहे.

Share.