दिनांक –१०/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचं वयाच्या 86 वर्षी निधन झालं. बुधवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज रतन टाटा यांच्यावर वरळीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

सोमवारी रात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान रतन टाटा यांना रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अचानक रक्तदाब कमी झाल्यामुळे रतन टाटा यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.

औद्योगिक क्षेत्रात मोठं योगदान देणारं, देसशेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहे. रतन टाटा यांच्याबद्दल देशातील जनतेला वेगळीच आपुलकी होती. टाटा कंपनीच्या माध्यमातून रतन टाटा यांनी लाखो कुटुंबाना आपलंसं केलं होतं. देशभक्ती व देशहिताचं आदर्श उदाहरण म्हणजे रतन टाटा असंही बोललं जायचं.

Share.