दिनांक –०५/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- भारताच्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमधली आघाडीची कंपनी असलेल्या झेलियो ईबाइक्सने एक आकर्षक, लक्षवेधी रूपासह डिझाइन केलेले, सुधारित ईवा झेडएक्स+ मॉडेल लॉन्च केले आहे. ज्यामध्ये ईवा आणि ईवा एको, नवीन ईवा झेडएक्स+ सारख्या मॉडेल्सचा समावेश आहे असा लोकप्रिय ईवा सीरीजचा भाग हा, विद्यार्थी, व्यावसायिक आणि हंगामी कामगार यांच्यासह आधुनिक शहरी प्रवाशांसाठी तयार करण्यात आला आहे, ज्यात शैली आणि कार्यक्षमतेच्या संयोजनाचा शोध घेण्यात आला आहे.

नव्याने पुन्हा डिझाईन केलेली ईवा झेडएक्स+, एक अशा प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटरचा अनुभव देते, जी २५ किमी/तासच्या टॉप स्पीड आणि एका चार्जवर १०० किमी पर्यंत प्रभावीरेंज सह, फॅशनेबल तितकीच कार्यक्षम आहे. ही स्कूटर, एक मजबूत बीएलडीसी मोटर (६०/७२व्ही) द्वारे चालित आहे आणि तिचे एकूण वजन ९० किलो आणि लोडिंग क्षमता १८० किलो आहे, जे कामगिरी आणि विश्वासार्हतेचे परिपूर्ण संतुलन पुरवतात. सुरळीत राइडसाठी फ्रंट डिस्क ब्रेक, रियर ड्रम ब्रेक आणि पुढील आणि मागील दोन्ही बाजूस हायड्रॉलिक शॉक अॅबसॉर्बरच्या वैशिष्ट्यांसह, ईवा झेडएक्स+ मध्ये सुरक्षितता आणि आरामाला प्राधान्य दिले गेले आहे.

ईवा झेडएक्स+ च्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये अँटी-थेफ्ट अलार्म, रिव्हर्स गियर, पार्किंग स्विच, ऑटो रिपेअर स्विच, यूएसबी चार्जिंग पोर्ट आणि अतिरिक्त सोयीसाठी डिजिटल डिस्प्ले यासारख्या प्रगत सुविधांचा समावेश आहे. निळा, राखाडी, पांढरा आणि काळा या विविध प्रकारच्या आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असलेली ईवा झेडएक्स+, शैलीची विविध प्राधान्ये पूर्ण करते. झेलियो, विविध कार्यक्षमतेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बॅटरीचे अनेक पर्याय पुरवते.

झेलियो ईबाइक्सचे सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक, श्री कुणाल आर्य म्हणाले, “झेलियो येथे, आम्ही भारतातील इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या सीमांचे उल्लंघन करण्यासाठी वचनबद्ध आहोत. पुन्हा डिझाइन केलेली ईवा झेडएक्स+, ही नाविन्य आणि सौंदर्यशास्त्रासाठीच्या आमच्या समर्पणाचा पुरावा आहे. केवळ कामगिरीचीच नव्हे तर शैलीच्या अभिव्यक्तीची देखील मागणी करणाऱ्या आधुनिक शहरी प्रवाशांच्या विकसित गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही हे मॉडेल काळजीपूर्वक तयार केले आहे. ईवा झेडएक्स+, निःसंशयपणे लो-स्पीड स्कूटर विभागात नवीन स्टँडर्ड स्थापित करून, शाश्वत भविष्यासाठी योगदान देत असताना, राइडिंगचा अतुलनीय अनुभव पुरवेल. आम्हाला खात्री आहे की, ईवा झेडएक्स+ चे नवीन रूप आणि वैशिष्ट्ये, अनेक रायडर्सना आकर्षित करतील, ज्यामुळे ती प्रवासासाठी त्वरित यशस्वी गोष्ट सिद्ध होईल.”

Share.