दिनांक –३०/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- भारताच्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमधील एक अग्रगण्य शक्ती असलेल्या झेलियो ईबाइक्सने आपले बहुप्रतिक्षित नावीन्य, प्रवासाचा अनुभव वाढवण्यासाठी डिझाइन केलेली हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर, मिस्ट्री लाँच करण्याची घोषणा केली आहे. फक्त ८१,९९९ रुपयांच्या किंमतीत, मिस्ट्री, शाश्वत गतिशीलतेशी अत्याधुनिक कामगिरीची सांगड घालते आणि शहरी व्यावसायिक आणि पर्यावरणाबाबत जागरूक रायडर्स दोघांच्याही गरजा पुरवते.
ही स्कूटर, ७२व्ही/२९एएच लिथियम-आयन बॅटरी आणि एक शक्तिशाली ७२व्ही मोटरसह सुसज्ज आहे आणि ती एका चार्जवर १०० कि.मी. ची प्रभावी रेंज आणि ७० कि.मी./तास चा टॉप स्पीड प्रदान करते, ज्यामुळे दररोजच्या प्रवासाच्या गरजांसाठी ती आदर्श स्कूटर बनते. १२० कि.ग्रॅ. चे एकूण वजन आणि १८० कि.ग्रॅ. ची लोडिंग क्षमता असलेली मिस्ट्री मजबूत बांधणीच्या गुणवत्तेचा देखील अभिमान बाळगते आणि सुनिश्चित करते की ती, वैयक्तिक आणि भारवाहक अशा दोन्ही प्रकारच्या राईडसाठी सहजपणे सज्ज आहे.
ब्लॅक, सी ग्रीन, ग्रे आणि रेड अशा विविध प्रकारच्या आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असलेली मिस्ट्री, कार्यक्षमतेशी तडजोड न करता वैयक्तिक शैलीची प्राधान्ये पूर्ण करते. रिव्हर्स गियर, पार्किंग स्विच, ऑटो रिपेअर स्विच, यूएसबी चार्जिंग आणि डिजिटल डिस्प्ले यासह तिची उत्कृष्ट वैशिष्ट्ये, वापरकर्त्याचा अनुभवात अधिक सुधारणा करतात, ज्यामुळे ती, इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमध्ये एक अत्यंत इष्ट पर्याय बनते.
झेलियो ईबाइक्सचे सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक, श्री कुणाल आर्य म्हणाले, “झेलियोमध्ये आम्ही नेहमीच नाविन्य आणि टिकाऊपणासाठी आमच्या वचनबद्धतेने प्रेरित आहोत. ही मिस्ट्री, कार्यप्रदर्शन, विश्वासार्हता आणि इको-कॉन्शियस डिझाइनचे परिपूर्ण मिश्रण असलेल्या आमच्या इलेक्ट्रिक स्कूटर लाइनअपमधील पुढील उत्क्रांतीचे प्रतिनिधित्व करते. तिची प्रभावशाली रेंज, उत्कृष्ट बांधणीची गुणवत्ता आणि प्रगत वैशिष्ट्यांसह, मिस्ट्री आजच्या प्रवाशांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे आणि त्याच वेळी ती, पर्यावरणास अनुकूल उद्याचा मार्ग मोकळा करते. आम्हाला विश्वास आहे की, ही स्कूटर आमच्या ग्राहकांच्या कल्पनांना आकर्षित करेल आणि इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात नवीन मानके स्थापित करेल.”
मिस्ट्रीची मजबूत बांधणीची गुणवत्ता आणि उच्च-कार्यक्षमता वैशिष्ट्ये, दीर्घकालीन वापरासाठी तिला एक विश्वासार्ह पर्याय बनवतात. टिकाऊपणावर लक्ष केंद्रित करून, पेट्रोल-आधारित वाहनांना शून्य-उत्सर्जन पर्याय पुरवून कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी तिला डिजाइन करण्यात आले आहे. हायड्रॉलिक शॉक अॅबसॉर्बर्स (पुढील आणि मागील) एक निर्बाध आणि आरामदायी राइड सुनिश्चित करतात, तर प्रगत कॉम्बी-ब्रेक सिस्टम, सुरक्षा आणि नियंत्रणामध्ये सुधारणा करते. डिजिटल डिस्प्ले, सेंट्रल लॉकिंग सिस्टम आणि अँटी थेफ्ट अलार्म, रायडर्सना मनःशांती सुनिश्चित करतात.
स्थापनेपासून झेलियो ईबाइक्स भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर उद्योगातील एक प्रमुख कंपनी म्हणून झपाट्याने उदयास आली आहे. देशभरातील २५६ हून अधिक डीलर्स आणि २,००,००० हून अधिक समाधानी ग्राहकांसह, झेलियो भारतातील इलेक्ट्रिक मोबिलिटी लँडस्केपमध्ये क्रांती घडवून आणण्याच्या मोहिमेवर आहे. मार्च २०२५ पर्यंत डीलरशिप नेटवर्क ४०० पर्यंत वाढवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे, ज्यामुळे देशभरात तिची उपस्थिती आणखी मजबूत होईल.