दिनांक –२१/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी एक मोठा निर्णय घेत कंपनीतील 10 टक्के व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले आहे. पिचाई यांचा हा निर्णय गुगलच्या दीर्घकाळापासून सुरू असलेल्या “कार्यक्षमता वाढवण्या”च्या प्लॅनिंगचा एक भाग असल्याचे बोलले जात आहे. सुंदर पिचाई यांनी बुधवारी आयोजित एका ऑल-हॅन्ड्स मिटिंगमध्ये, या निर्णयाचा उद्देश गुगलची कार्यक्षमता दुप्पट करणे, असा असल्याचे कर्मचाऱ्यांसोबत बोलताना म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, ही कपात प्रामुख्याने मॅनेजर, डायरेक्टर आणि उपाध्यक्ष पदावर करण्यात आली आहे.
Share.