दिनांक –३०/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- महाराष्‍ट्राच्या आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार तसेच निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ.सुखबीर सिंह संधू यांचे शिष्टमंडळ महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.

या शिष्टमंडळाने आज ट्रायडेंट हॉटेल येथे आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीचा आढावा विविध अंमलबजावणी यंत्रणांकडून घेतला. यावेळी मुख्य सचिव, तसेच सर्व संबंधित यंत्रणांच्या प्रमुखांकडून सविस्तर आढावा घेतला. त्याचप्रमाणे राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्यासमवेत चर्चा करून त्यांच्या सूचनाही आयोगाने घेतल्या.

Share.