दिनांक –०५/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- जिममध्ये व्यायाम करताना माण गाव येथील प्रसिद्ध पैलवान विक्रम पारखी (वय-३०) याचा ह्रदयविकाराने मृत्यू झाला. बिर्ला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले पण, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरातील कुस्ती क्षेत्रावर शोककळा पसरली. त्याच्या मागे वडिल माजी सैनिक शिवाजीराव पारखी, एक थोरला भाऊ आणि एक बहिण असा परिवार आहे. पैलवान पारखी याचे १२ डिसेंबरला लग्न होणार होते मात्र, काळाने त्यापूर्वीच झडप घातली आणि एक नामांकित कुमार महाराष्ट्र केसरी हरपला. पारखी कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.
पैलवान विक्रम पारखी यांना भावपूर्ण श्रद्धांजली…!
Share.