दिनांक –१९/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- महाराष्ट्रात चार दशके राजकारण गाजवणाऱ्या बड्य नेत्याची राजकीय संन्यासाची घोषणा; व्हिडीओ आला समोर महाराष्ट्रातील राजकारणात चार दशकांपासून कार्यरत असलेले पूर्वीश्रमीचे भाजप नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांनी सोमवारी मोठी घोषणा केली आहे.
एकनाथ खडसे यांनी निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी त्यांनी राजकीय संन्यासाची घोषणा केली. यापुढे कोणतीही निवडणूक न लढण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. तसेच यावेळी भावनिक वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केले. पुढील निवडणूक मी पाहणार की नाही पाहणार हे तो ईश्वरच ठरवेल, असे म्हणत त्यांनी मुलगी रोहिणी खडसे हिला विजयी करण्याचे आवाहन केले.