दिनांक –०६/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:-  उल्हासनगर शहरात बंदी असलेल्या गुटख्याचा धंदा सर्रास सुरू आहे. शहरातील अनेक गुटखा माफिया शहरात सक्रिय असून गुजरातसह देशाच्या कानाकोपऱ्यातून बंदी असलेला गुटखा शहरात आणतात. अशा स्थितीत विठ्ठलवाडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 1 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, तीन गुटखा तस्करांना अटक करून गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून गुटख्याच्या तस्करांना पकडले, त्यात 3 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात गुटखा आणि फ्लेवरयुक्त तंबाखू जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली.

Share.