दिनांक –०८/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच इर्षाळवाडी येथे भेट दिली होती. त्यावेळी महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात त्यांनी पालकमंत्री रायगड तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांना निर्देश दिले होते. या सुचनेनुसार जिल्हा उद्योग केंद्र रायगडद्वारे इरसाळवाडी येथे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम कार्यशाळा घेण्यात आली. तसेच महिलांना प्रशिक्षण देण्यात आले.
इर्षाळवाडी येथे आयोजित या कार्यशाळेकरिता ग्रामपंचायत चौक व इरसाळवाडी येथील सुमारे 70 महिला उपस्थित होत्या. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थाक जी.एस.हरळया व अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री.कुलकर्णी यांनी उपस्थित महिलांना योजनेविषयी सविस्तर माहिती दिली.
उपस्थित काही महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज येथे केले असून उर्वरित इच्छुक महिला ग्रामपंचायतीद्वारे जिल्हा उद्योग केंद्राकडे अर्ज सादर करणार आहेत. सरपंच श्रीमती ठोंबरे यांनी आभार मानले.