दिनांक –१८/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- पी. एम. श्री. स्कूल जवाहर नवोदय विद्यालय, रायगडच्या सत्र 2025-26 करीता इयत्ता 6 वी च्या निवड परीक्षेचे ऑनलाईन अर्ज https://navodaya.gov.in या संकेतस्थळावर सादर करण्याची प्रक्रिया सुरु असून ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 23 सप्टेंबर 2024 पर्यंत वाढविण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील सर्व परीक्षार्थी, पालक, सर्व शिक्षक व मुख्याध्यापक यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रभारी प्राचार्य, जवाहर नवोदय विद्यालय मनोज राऊत यांनी केले आहे.
अधिक माहित्तीसाठी श्री.संतोष आर.चिंचकर मो.9881351601, श्री.अर्जुन गायकवाड मो.9862793640 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.