दिनांक –२१/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- इझमायट्रिप डॉटकॉम या भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाइन ट्रॅव्हल टेक प्लॅटफॉर्मने आज ऑस्ट्रेलिया-स्थित सर्वसमावेशक शिक्षण सेवा प्रदाता प्लॅनेट एज्युकेशन ऑस्ट्रेलिया पीटीवाय लि.च्या संपादनाला मान्यता मिळाल्याची घोषणा केली, जेथे ४९ टक्के देय भरलेल्या शेअर भांडवालाची धोरणात्मक गुंतवणूक करण्यात आली आहे. ही धोरणात्मक गुंतवणूक इझमायट्रिपच्या आंतरराष्ट्रीय स्टडी टुरिझममधील प्रवेशाला सादर करते आणि पर्यटन क्षेत्रातील त्यांच्या स्थानाला अधिक दृढ करते.
१९९९ मध्ये स्थापना करण्यात आलेल्या प्लॅनेट एज्युकेशनने आघाडीची शिक्षण सेवा प्रदाता म्हणून स्वत:चा दर्जा स्थापित केला आहे, तसेच उद्योगामध्ये २५ वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. कंपनी परेदशात शिक्षण घेण्याच्या सर्वसमावेशक सेवा देते, ज्यामध्ये तज्ञांसोबत समुपदेशन, युनिव्हर्सिटी प्लेसमेंट्स आणि व्हिसा असिस्टण्सचा समावेश आहे.
हे संपादन इझमायट्रिपच्या सेवा ऑफरिंग्ज विस्तारित करण्याच्या आणि स्टडी टुरिझममध्ये प्रवेश करत ग्राहकांसाठी अधिक सर्वसमावेशक ट्रॅव्हल इकोसिस्टम डिझाइन करण्याच्या दृष्टिकोनाशी संलग्न आहे. हे संपादन आणखी एका पर्यटन क्षेत्रात इझमायट्रिपचा प्रवेश सक्षम करेल आणि प्लॅनेट एज्युकेशनचा आंतरराष्ट्रीय शिक्षण सेवांमधील व्यापक अनुभव व त्यांच्या प्रबळ उपस्थितीचा फायदा घेईल. बदल्यात, प्लॅनेट एज्युकेशनला इझमायट्रिपचा व्यापक ग्राहकवर्ग, बी२बी एजंट्स नेटवर्क आणि टेक क्षमता उपलब्ध होतील.
इझमायट्रिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सह-संस्थापक श्री. निशांत पिट्टी म्हणाले, ”दरवर्षी लाखो विद्यार्थी यूएसए, कॅनडा, यूके, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, न्यूझीलंड आणि आयर्लंड अशा देशांमध्ये उच्च शिक्षण घेतात. प्लॅनेट एज्युकेशनमधील आमचे संपादन विकसित होत असलेल्या आंतरराष्ट्रीय स्टडी टुरिझममध्ये प्रवेश करण्याच्या दिशेने धोरणात्मक पाऊल आहे, जे आम्हाला विनासायास, एण्ड-टू-एण्ड अनुभव देईल, ज्यामध्ये ग्राहकांसाठी शिक्षण व प्रवास सेवांचा समावेश असेल. प्लॅनेट एज्युकेशनच्या कौशल्याचा फायदा घेत आमचा विद्यार्थ्यांसाठी व्हिसा प्रक्रिया आणि डॉक्यूमेंटेशन (कागदपत्र व्यवहार) सोपे व विनासायास करण्याचा मनसुबा आहे. आम्हाला प्लॅनेट एज्युकेशनच्या मॉडेलमध्ये मोठी क्षमता दिसून येते आणि बहुमूल्य ग्राहकांसाठी सुधारित मूल्य निर्माण करण्याकरिता त्यांच्या कौशल्यांसह आमच्या तंत्रज्ञान-संचालित क्षमतांना एकत्रित करण्यास उत्सुक आहोत.”