दिनांक –०७/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानच्या वतीने मुंबई आणि परिसरातील शहरांमधील सातारकरांचा भव्य दसरा मेळावा गुरुवार दिनांक १० ऑक्टोबर २०२४ या दिवशी सायंकाळी पाच वाजता दादर येथील शिवाजी मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी प्रमुख अतिथी महंत स. भ.मोहनबुवा रामदासी,विजयजी शिर्के , शिर्के ग्रुप,कायदेतज्ज्ञ ऍड.उदयजी वारुंजीकर,हास्यसम्राट भाऊ कदम तसेच अन्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या मेळाव्याचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांना सातारा रत्न आणि सातारा भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहेत. हे पुरस्कार जाहीर झालेले मान्यवर असे राजकीय रत्न – श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, कला रत्न – राहुल भंडारे, कामगार रत्न – मनोज धुमाळ, क्रीडा रत्न – विनया माने, साहित्य रत्न – अरुण गोडबोले , शैक्षणिक रत्न – अंजली गोडसे, सामाजिक रत्न – विकास धनवडे, उद्योग रत्न – शिवाजीराव माने, पत्रकारिता – निलेश बुधावले, वैद्यकीय रत्न – डॉ. अरुण माने, कायदा रत्न – ऍड.पांडुरंग पोळ, प्रशासकीय रत्न – सोमनाथ घार्गे (भापोसे ), सहकार रत्न – विनायक गाढवे. याशिवाय सातारभूषण पुरस्कार सन्माननीय किरण सोनवणे, संपत शेवाळे, सुरेश गोडसे, प्राची कोल्हटकर-जांभेकर, कु.भार्गव जगताप यांना तसेच वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्ट, मुंबई यांना प्रदान करण्यात येणार आहेत.
संघटनेचे अध्यक्ष नाना निकम, उपाध्यक्ष व माजी आमदार बाबुराव माने तसेच राजाराम शिंदे, महेश पवार, दिपक यादव, श्रीधर फडतरे, दिनकर गाढवे, दत्ताजीराव फाळके, अनिल जाधव, सुभाष चव्हाण, एकनाथ तांबवेकर, शिवाजीराव जाधव, अशोक चव्हाण, रमेश मोरे, पद्मावती शिंदे, आसावरी भोईटे, सागर घाडगे, समर्थ देशमुख आदी विश्वस्त व इतर मान्यवर देखील उपस्थित राहतील. यावेळी सोन वाटप करून दसरा साजरा केला जातो.अधिकाधिक सातारकरांनी यावेळी उपस्थित रहावे ,असे आवाहन आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
Breaking
- पुणे धर्मादाय सहआयुक्त रजनी क्षीरसागरांचा मेरिटवर पारदर्शक कारभार!
- पाचोरा शहरातील अवैध धंद्याच्या टपऱ्याचे अतिक्रमण काढले. “कायदे मे रहोगे तो फायदे मे रहोगे” – श्री.मंगेश देवरे ,पाचोरा नगरपरिषद मुख्यअधिकारी.
- अवैधधंदे सट्टाच्या टपऱ्याचे अतिक्रमण पाचोरा शहरात मोठ्या प्रमाणात न .पा. अधिकारी कुंभ करणाच्या गाड़ झोपेत.
- वडिलांनी हाकलून दिले, एका वर्षात घटस्फोट, संपूर्ण कारकिर्दीत फक्त 2 हिट्स सिनेमे; तरीही अभिनेत्रीचं नेटवर्थ 170 करोड
- ‘आळंदीतील अनधिकृत वारकरी शिक्षण संस्थांवर 48 तासात कारवाई करा’; रुपाली चाकणकरांचे आदेश
- विठाई प्रतिष्ठान (रजि) आयोजित सार्वजनिक माघी गणेशोत्सव २०२५
- वाडा तालुक्यात टायर जाळणाऱ्या अवैध कंपनीत स्फोट झाला यात पाच लोक गंभीर जखमी तर दोन बालक मयत झाले आहेत.
- नोकरीवरून काढले म्हणून कर्मचाऱ्याने ऑफिसच्या गेटवरच केली काळी जादू