दिनांक –०४/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- मंत्रालयाच्या सुरक्षा जाळीवर उड्या घेत आंदोलन सुरु केल्याची बातमी समोर आली आहे. धनगर आरक्षणाचा मुद्दा आणि विविध मागण्यांसाठी आदिवासी समाजाच्या आमदारांकडून आंदोलन करण्यात येत आहे. या आमदारांनी आज मंत्रालयात प्रवेश करत तिसऱ्या मजल्यावरून संरक्षक जाळीवर मारल्या उड्या आहेत. यामध्ये अजित पवार गटाचे आमदार तथा विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याही समावेश आहे.

हा प्रकार लक्ष्यात घेता मंत्रालयातील पोलिसांनी धाव घेत आंदोलनकर्त्या आमदारांना जाळीतून बाहेर काढण्यात आले आहे. मात्र नरहरी झिरवळ यांचा रक्त दाब वाढला होता.
मंत्रालयात या पूर्वी अनेक सर्वसामान्य नागरिकांनी आपली काम न झाल्याने वैतागून उड्या मारल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र आज चक्क आमदारांनी उड्या मारल्याने मंत्रालयत एक खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आज आदिवासी समाजातील आमदार आणि नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना एक तासाच्या प्रतीक्षेनंतर भेटले. यावेळी त्यांनी आरक्षण आणि अन्य मागण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. परंतु या चर्चेतून कोणताही ठोस निर्णय निघाला नाही. त्यापूर्वी त्यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची ही आदिवासी समाजातील आमदारांनी भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या भेटीवेळी धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये. ही मुख्य मागणी आदिवासी समाजातील आमदारांनी केली. परंतु यावर मुख्यमंत्र्यांनी कुठलंही ठोस उत्तर दिले नाही. त्यामुळे आपली मागणी मान्य व्हावी, यासाठी आमदारांनी मंत्रालयाच्या संरक्षण जाळीवर चढून आंदोलन केलं.

Share.