दिनांक –२३/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारतीचे अभ्यास मंडळ सदस्य प्रा. सुनील शिंदे यांना स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
ते कनिष्ठ महाविद्यालयीन इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य व कनिष्ठ महाविद्यालयीन समाजशास्त्र परिषद महाराष्ट्र राज्याचे संस्थापक कार्याध्यक्ष म्हणूनही कार्यरत असून लेखक, समीक्षक, संपादक, व्याख्याते, समाजशास्त्र व इतिहास विषयाचे तज्ञ शिक्षक, अशी त्यांची ओळख आहे. उपक्रमशील प्राध्यापक ते श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूरच्या कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यासमिती सदस्य, समाजशास्त्र अभ्यास मंडळ चेअरमन, विषयतज्ञ मार्गदर्शक, पेपर सेटर, शाळासिद्धि मूल्यांकन प्रमाणीकरन समितीचे सदस्य असून सध्या ते लाल बहादूर शास्त्री कॉलेज सातारा येथे उपप्राचार्यपदी कार्यरत आहेत.
या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिवा प्राचार्या शुभांगीताई गावडे, सहसचिव प्राचार्य एस. एम. गवळी, प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे, प्राचार्य राजेंद्र शेजवळ, व्यवस्थापक मंडळ सदस्य कौस्तुभ गावडे, प्राचार्य डॉ. कॅप्टन महेश गायकवाड प्राचार्य अनिल साकोरे प्रा. डॉ. सौ. वैशाली शिंदे, प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व सोनगाव स.निंब चे ग्रामस्थ यांनी प्रा. सुनील शिंदे यांचे अभिनंदन केले आहे.