दिनांक –२३/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- तालुक्यातील नावाजलेल्या संस्थेतील एका गावात इंग्रजी माध्यमाच्या सी बी एस सी शाळेत शिक्षकांची मानसिक व शारीरिक पिळवणूक होत असल्याने शिक्षक व कर्मचारी तणावाखाली काम करत आहे. शाळेतील मुख्याध्यापक व संस्था चालक प्रत्येक गोष्टीत शिक्षकांना मानसिक त्रास देत असल्याचे दिसून येत आहे. शालेय कामकाजाचे अतिरिक्त ओझे शिक्षकांवर पडत असून कोणालाही आपले मत व्यक्त करण्यास येथे स्वातंत्र्य नाही. मी म्हणेल तोच कायदा आणि मी सांगेल तीच पूर्व दिशा असे प्रकारचे वातावरण शाळेत तयार झालेले आहे. वैयक्तिक कामासाठी किंवा आजारी असल्यास हक्काच्या रजा सुद्धा वेळेवर भेटत नसून कोणी काही बोलल्यास कामावरून काढण्याचे धमक्या येथील कर्मचारी व शिक्षकांना देण्यात येतात. शिक्षकांना मानसिक दृष्ट्या त्रास देत काहींना गंभीर आजार उद्भवू लागले आहे यात कोणाचे कमी जास्त झाले याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे. शाळा म्हटल्यावर आनंदाचे प्रफुल्लित वातावरण ज्ञानदानाचे धडे गिरवले जातात पण येथील शाळेत तणावाचे वातावरण जर असेल तर त्याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर नक्कीच होत आहे.
शाळेतील मुख्याध्यापक प्रत्येक गोष्टीत शिक्षकांचा अपमान करत खाजगी गोष्टी काढत रागवतात तसेच नोकरीवरून काढण्याची धमकी वारंवार देण्यात येत आहे यामुळे शिक्षकांचे जगणे असह्य झाले आहे. यात महिला शिक्षिका जास्त असून घरचे कामे करून ते शाळेत येतात आणि पुन्हा घरीही शाळेची कामे करतात कामाचेही अतिरिक्त भार त्यांच्यावर लादला जात आहे. कोणत्याही प्रकारची कौतुकाची थाप न देता कायम मी पण अंगी बानत कायम टॉर्चेर व प्रेशराइज्ड केले जात असून मनमानी कारभार केला जातोय. कोणीही बोलायचे नाही हसायचे नाही वर्गात बसायचे पण नाही तासिका नसल्यास कामेच करायची. एखादा महत्वाचा फोन असल्यास तो सुद्धा घ्यावयाचा नाही कोणीही कोणता सल्ला ही द्यायचा नाही. अशा अनेक प्रकारे छळ येथे सुरू असल्याचे चित्र दिसते. दोन – तीन महिन्यांचे पगारही वेळेत दिले जात नसल्याने शिक्षक व कर्मचारी आर्थिक संकटात सापडत आहे. नोकरी मिळत नसल्याने आपल्या पोटाची खळगी भागवण्यासाठी हा त्रास मुकाटपणे सहन करत एखाद्या कारागृहात असल्या सारखे शिक्षक जीवन जगत आहे. या बाबत शिक्षकांच्या हक्कासाठी शिक्षक संघटनांनी गांभीर्याने विचार करत यावर आवाज उठवणे फार गरजेचे आहे.