दिनांक –०६/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- अनधिकृत अतिक्रमणाचा विळखा पाचोरा शहरात अतिक्रमण जागेवर ठेवलेल्या टपऱ्या वरती बेक़ायदेशीर सट्याची पाने लिहले जात आहे. पाचोरा नगरपालिका प्रशासनाने ताबडतोब सदर टपऱ्या उचलून सदर जागा सील करावे  कोणी सील तोडल्यास मोठा दंड आकारण्यात यावा. पाचोरा शहरात परसलेली ही घाण दूर करावी. शहरातील सर्व  मुख्य चौक आणि बाजार पेठ मधील अनाधिकृतपणे सट्टा सुरु असणाऱ्या टपऱ्या  शोधून ताबडतोब नगरपालिका मार्फत उचलण्यात याव्या पाचोरा येथील कर्तव्यदक्ष न.पा मुख्यअधिकारी  स्थानिक प्रशासन यांनी तात्काळ लक्ष घालावे अन्यथा सर्व टपऱ्या वरील प्रकार नगरविकास सचिव आणि जिल्हाधिकारी  जळगाव यांना लाइव्ह पाठवण्यात येईल. पाचोरा शहरातील अतिक्रमण मध्ये अवैध धंदे सट्टा पत्ता मटका जोरात सुरू आहे. त्यावर तात्काळ कार्यवाही करून सदर धंदा बंद करावा.

Share.