दिनांक –३०/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- अलिबाग पंचायत समिती येथे स्वच्छता कर्मचारी यांचे आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न झाले. याशिबिरात अलिबाग तालुक्यातील ग्रामपंचायतींचे 100 स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते. रायगड जिल्ह्यात सर्व ग्राम पंचायतीमध्ये स्वच्छता ही सेवा अभियान सुरू असून स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता या थीम नुसार विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यामध्ये सफाई कर्मचारी यांची आरोग्य तपासणी व त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी अलिबाग येथे शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्याचा लाभ अनेक स्वच्छता कर्मचारी यांना मिळाला. इतर तपासणी बरोबर डोळ्यांची तपासणी करून सेप्टिक गॉगल्स देण्यात आले..

यावेळी रायगड जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती शुभांगी नाखले मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, सफाई कर्मचारी गावाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी महत्वाचा भूमिका पार पाडतात. त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जावी म्हणून शासनाने स्वच्छता ही सेवा अभियानामध्ये अशी शिबिरे आयोजित करण्यास सूचना दिल्या होत्या त्यानुसार जिह्यात सर्व पंचायत समितींनी शिबिरांचे आयोजन केले होते.

जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड सांगितले की, आरोग्याची काळजी घेताना स्वच्छता कर्मचाऱ्यांनी मास्क वापरावा, हातात ग्लोज असावेत, पायात गम बुट व डोळ्यांच्या संरक्षणासाठी गॉगलचा वापर करून स्वतःची सुरक्षितता जपावी असे आवाहन केले.

माणुसकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.राजाराम हुलवान यांनी सूत्र संचलनात सांगितले की, स्वच्छता कर्मचारी यांनी नियमित वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, शारीरिक इजा होऊ नये म्हणून दक्षता घ्यावी, आजाराकडे दुर्लक्ष करू नये, शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, स्वतः बरोबर कुटुंबाची आरोग्य चांगले ठेवण्यासाठी प्रयत्न करावा.

यावेळी रायगड मेडिकल असोसिएशन अध्यक्ष डॉ. निशिकांत आठवले यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, स्वच्छता कर्मचारी यांनी तंबाखू, दारू, गुटखा,सिगारेट या व्यसनापासून दूर राहावे. व्यसनमुक्त राहून चांगला आहार घ्यावा, स्वच्छ अन्न घ्यावे, घाणीच्या जागेवर जेऊ नये व नियमित लसीकरण करून स्वतःचे आरोग्य जपावे तरच कुटुंबाचे स्वास्थ्य चांगले राहील. रायगड मेडिकल असोसिएशन स्वच्छता कर्मचारी यांना सर्वतोपरी सहकार्य करेल असे आश्वासन त्यांनी दिले.

रायगड मेडिकल असोसिएशनचे सचिव डॉ.राजेंद्र चांदोरकर, सिव्हिल हॉस्पिटल अलिबाग कुष्ठ रोग विभाग प्रमुख डॉ.संकपाळ, सिव्हिल हॉस्पिटलचे मेडिकल ऑफिसर डॉ.किमया, डॉ.ऋषिकेश तसेच लायन्स क्लब अलिबाग डायमंड अध्यक्षा डॉ.रेखा म्हात्रे, ॲड.गौरी म्हात्रे, सहाय्यक प्रशासन अधिकारी राजेंद्र भंडे, संवाद तज्ञ सुरेश पाटील, श्रीमती अनिषा पाटील, श्रीमती रश्मी घरत आदी उपस्थित होते.

क्रिस्टल आय अलिबाग यांनी सुरक्षा गॉगल दिले शिबिरासाठी अलिबागचे गट विकास अधिकारी दाजी दाईगडे ,माणुसकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.राजाराम हुलवान, रायगड मेडिकल असोसिएशन सर्व पदाधिकारी तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबागचे डॉक्टर्स व कर्मचारी,लायन्स क्लब ऑफ अलिबाग, लायन्स क्लब अलिबाग डायमंड व क्रिस्टल आय सेंटर अलिबाग यांचे सहकार्य लाभले.

Share.